Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याचा धोका 13 % जास्त? हृदयविकाराचा या दिवसाशी काय संबंध?

by
June 13, 2023
in आरोग्य वार्ता
A A
सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याचा धोका 13 % जास्त? हृदयविकाराचा या दिवसाशी काय संबंध?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – हृदयविकाराचा झटका हे जगभरातील अचानक मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. एका अंदाजानुसार, कोरोनरी हार्ट डिसीज (CHD) हा हृदयविकाराचा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्यामुळे दरवर्षी सुमारे चार लाख लोकांचा मृत्यू होतो. एकट्या अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने 8 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

कोविड महामारीनंतर हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे अधिक नोंदवली जात आहेत, असे आरोग्य तज्ञ म्हणतात. याची अनेक कारणे असू शकतात, परंतु नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी नोंदवले आहे की सोमवार हा आठवड्याचा असा दिवस आहे ज्या दिवशी गंभीर हृदयविकाराचा धोका जास्त असू शकतो.

जीवनशैली आणि आहारविषयक समस्या आतापर्यंत हृदयविकाराच्या जोखमीशी जोडल्या गेल्या आहेत. तथापि, या अभ्यासात, हृदयविकाराच्या गंभीर प्रकरणाचे विशिष्ट दिवसाशी संबंध असल्याचे वर्णन केले आहे. चला तर, जाणून घेऊया यामागे वैज्ञानिकांचा सिद्धांत काय आहे?

* सोमवारी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 13% अधिक आहे?
मँचेस्टर, यूके येथे ब्रिटिश कार्डिओव्हस्कुलर सोसायटी (BCS) परिषदेत सादर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की सोमवारी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 13% अधिक असू शकते.

कामाच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी गंभीर आणि जीवघेणा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका इतर कोणत्याही दिवसापेक्षा जास्त असू शकतो. यासाठी, संशोधकांनी 2013 ते 2018 दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र प्रकारामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या आयर्लंडमधील 10,528 रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले.

* सर्कॅडियन रिदम आणि एसटीईएमआयचा धोका
तीव्र हृदयविकाराचा झटका, ज्याला एसटी-सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन (STEMI) असेही म्हणतात, हे तेव्हा होते, जेव्हा मुख्य कोरोनरी धमनी पूर्णपणे अवरोधित होते.

संशोधकांनी डेटाचा अभ्यास केला आणि असे आढळले की आठवड्याच्या सुरुवातीला एसटीईएमआयच्या तक्रारी जास्त असू शकतात. सोमवारी सर्वाधिक दर असतात तर रविवारी लक्षणीयरीत्या कमी होते. असे का घडते याची कारणे फारशी स्पष्ट नाहीत, परंतु अभ्यास असे सूचित करतात की सर्कॅडियन रिदम (शरीराची झोपे-जागण्याची चक्रे) एक घटक असू शकतात.

* हृदयावर सर्कॅडियन रिदमचा प्रभाव

बेलफास्ट हेल्थ अँड सोशल केअर ट्रस्टच्या संशोधनाचे नेतृत्व करणारे कार्डिओलॉजिस्ट डॉ जॅक लाफ्टन या अहवालात स्पष्ट करतात, “आम्ही आठवड्याच्या सुरुवातीला अधिक STEMI प्रकरणे पाहिली आहेत. अनेकदा आठवड्याच्या शेवटी झोपेची वेळ बदलते, दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी पुन्हा लवकर उठणे आणि कामावर जाणे शरीरावर प्रभावित ठरू शकते.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार, सर्कॅडियन रिदम हृदयाच्या शारीरिक आणि पॅथॉलॉजिकल कार्यांचे नियमन करते. त्यात वारंवार बदल केल्याने हे चक्र बिघडू शकते ज्यामुळे गंभीर हृदयविकाराचा धोका असतो.

* संशोधक काय म्हणतात?
ब्रिटिश हार्ट फाउंडेशन (BHF) चे वैद्यकीय संचालक प्रोफेसर सर नीलेश सामानी म्हणतात: “तीव्र हृदयविकाराच्या वेळेनुसार, सर्कॅडियन रिदमच्या या सिद्धांताची पुष्टी करण्यासाठी आम्हाला अधिक तपशीलवार संशोधनाची आवश्यकता आहे.” झोपेचा त्रास किंवा त्याच्या वेळेत वारंवार होणारे बदल हृदयाच्या समस्या वाढवू शकतात यात शंका नाही. याबाबत प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.

The post सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याचा धोका 13 % जास्त? हृदयविकाराचा या दिवसाशी काय संबंध? appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar