Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सॅमसंग, आयफोनला मागे टाकून ‘हा’ ब्रँड बनला जगातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड !

by प्रभात वृत्तसेवा
August 9, 2021
in लाईफस्टाईल
A A
सॅमसंग, आयफोनला मागे टाकून ‘हा’ ब्रँड बनला जगातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी (Xiaomi) जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक आहे. त्यांचे स्मार्टफोन जगभर चालतात. अलीकडेच, शाओमीने असे काही केले आहे ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. शाओमी आपल्या स्मार्टफोनच्या उत्कृष्ट विक्रीमुळे जगातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आणि अमेरिकन कंपनी ऍपलला मागे टाकून शाओमीने हा चमत्कार केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून सॅमसंग हा जगातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड होता. पण आता जगातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँडशी शाओमीचे नाव जोडले गेले आहे.

काउंटरपॉईंटचा ताजा अहवाल
शाओमी जगातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनल्याची माहिती काउंटरपॉईंटच्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे. काउंटरपॉईंट रिसर्चच्या मंथली मार्केट पल्स सर्व्हिसच्या माहितीनुसार, 2021च्या जून महिन्यात शाओमीच्या स्मार्टफोनच्या विक्रीत 26% वाढ झाली आहे. या वाढीव विक्रीमुळे, शाओमी या महिन्यात सर्वात वेगाने वाढणारा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे.

विक्रीच्या बाबतीत, शाओमी कंपनी 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. शाओमी कंपनी 2011 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून शाओमीने 80 कोटी स्मार्टफोन विकले आहेत.

शाओमी पहिल्या क्रमांकावर येण्याचे कारण
तज्ज्ञ्यांच्या म्हणण्यानुसार चीनी कंपनी हुआवेईच्या व्यवसायातील घसरणीचा सर्वाधिक फायदा शाओमीने घेतला आहे. अशा परिस्थितीत शाओमीने अनेक स्मार्टफोन लाँच केले, ज्याचा कंपनीला फायदा झाला. सध्या, शाओमीने चीनसह युरोप, मध्य-पूर्व आणि आफ्रिका सारख्या देशांमध्ये हुआवेई आणि ऑनरच्या बाजारांवर कब्जा केला आहे. यासह, सॅमसंगने जूनमध्ये उत्पादन आणि पुरवठा कमी केल्याचा फायदा घेत, शाओमीने भारत आणि युरोपियन देशांमध्ये आपली विक्री देखील वाढवली. यामुळे शाओमीला जगातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बनण्यास मदत झाली.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar