Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सिंहगड रोडवरील आरोग्य सेवेत नवे पर्व: डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरचे भव्य उद्घाटन

by
September 1, 2025
in आरोग्य वार्ता
A A
सिंहगड रोडवरील आरोग्य सेवेत नवे पर्व: डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरचे भव्य उद्घाटन
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

पुणे: माणिक बाग, सिंहगड रोड परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरच्या उद्घाटनाने आरोग्य सेवेच्या क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली. रविवारी झालेल्या या भव्य सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, पद्मश्री डॉ. विजय डोंगरे, तसेच डॉ. अनिल दुधभाते यांचे आई-वडील, काका चव्हाण, कुमारभाऊ गोसावी, पीडीसीसी बँकेचे दिगंबर दुर्गाडे, माजी नगरसेवक विकास दांगट, प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, अशोक हरणावळ, अक्रूर कुदळे, शैलेश चरवड, बाळासाहेब कापरे, अशोक शेजाळ, सोपान काळे, विलास पाटील, रुक्मिणी गलांडे यांच्यासह वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. अनिल दुधभाते यांनी शून्यातून विश्व निर्माण करत दहा हजार चौरस फुटांचे अत्याधुनिक सुसज्ज नेत्रालय उभारले आहे. डोळ्यांच्या सर्व आजारांवर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून हे केंद्र उभारण्यात आले आहे. येथे पुणेकरांसह ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा मिळणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी बोलताना डॉ. दुधभाते यांच्या कार्याचे कौतुक करत सर्वसामान्यांना परवडणारी आणि दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तीन मजली असलेले हे नेत्रालय डोळ्यांच्या विविध आजारांचे तपासणी, निदान आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे ठरेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहाय्याने हे केंद्र सिंहगड रोड परिसरातील आरोग्य सेवेत मोलाची भर घालणार आहे. पुणेकरांसाठी हे रुग्णालय एक मोठे वरदान ठरणार असून, ग्रामीण भागातील रुग्णांनाही येथे विश्वासार्ह आणि परवडणारी सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Join our WhatsApp Channel

The post सिंहगड रोडवरील आरोग्य सेवेत नवे पर्व: डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरचे भव्य उद्घाटन appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar