Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सासू-सुनेचे नातेसंबंध ‘असे’ बनवा मधुर आणि मजबूत

by प्रभात वृत्तसेवा
August 19, 2021
in लाईफस्टाईल
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, कोणत्याही मुलीला नवीन घरात जुळवून घ्यायला वेळ लागतो. तिला घरातील सर्व सदस्यांशी जुळवून घ्यावे लागते. विशेषतः सासू-सासऱ्यांसोबत. त्याचबरोबर सासूसुद्धा काळजी करते की नवीन सून घरात कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जाऊ नये. पण तरीही, कालांतराने, दोघींमध्ये संघर्ष निर्माण होतात, जे त्यांचे संबंध बिघडवतात. मात्र, काही छोट्या छोट्या गोष्टी दोघींनी लक्षात ठेवल्या तर गुंतागुंतीचे दिसणारे सासू-सून संबंध मधुर आणि मजबूत बनवता येतील.

एकमेकींशी मैत्री करा

नातं घट्ट करण्यासाठी सासू-सुनेला एकमेकांना आपली मैत्रीण बनवावी लागेल. जेव्हा दोघेही एकमेकांसोबत मैत्रीण म्हणून त्यांच्या गोष्टी शेअर करतील, तेव्हा भांडण, मतभेद, वाद वगैरे काहीच राहणार नाही.

एकमेकांना महत्त्व द्या

सासू-सून यांचे नाते अत्यंत नाजूक असते. हे नातं चांगलं बनवण्याची जबाबदारी जितकी सासूची आहे तितकीच सुनेचीही आहे. जर तुमची सून काम करत असेल, तिला घरकामासाठी जास्त वेळ काढणे कठीण होत असेल, तेव्हा सासूने आपल्या सुनेच्या कामाला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, सुनेनेही आठवड्याच्या शेवटी सासूबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे दोघांमधील बंध अधिक दृढ होईल.

गैरसमज दूर करा

कुटुंब म्हटले कि भांड्याला भांड लागतंच. काही नात्यांमध्येही असेच घडते. एकत्र राहण्यामुळे काही गोष्टींवर वाद किंवा गैरसमज होणे स्वाभाविक आहे, पण ते जास्त वाढू देऊ नका. अशा परिस्थितीत सून आणि सासू या दोघींनीही आपला अहंकार बाजूला ठेवून एकमेकींशी बोलले पाहिजे.

गोष्टी शेअर करा

सासू-सासऱ्यांनी नातेसंबंध मजबूत करण्यासाठी एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. असे केल्याने दोघींमधील अंतर कमी होईल आणि त्या  एकमेकांना त्यांचे आनंद, दुःख आणि नाराजी उघडपणे सांगू शकतील.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar