पुणे – नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. येत्या 15 जानेवारीला म्हणजेच, उद्या मकर संक्रांत असून हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिळगुळासोबतचं काळ्या साडीला अत्याधिक यादिवशी महत्व आणि मान असतो. दरम्यान, संक्रातीच्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून तुम्ही काही खास गोष्टी करणे नक्की टाळा. अन्यथा, त्याचे परिणाम वर्षभर भोगावे लागतील असा सल्ला घरातले लोक आपल्याला देत असतात. आज आम्ही तुम्हाला याच खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत….
1) उद्या मकर संक्रात असून, या दिवशी तुम्ही कोणाशीही कठोर बोलणं टाळावं, वाईट कोणाला बोलू नये, तसेच कोणाशी वाद-विवाद करू नये. सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. कुणाचे मन दुखावेल असं चुकूनही वागू नका.
2) संक्रातीच्या दिवशी कृषी विषयक कर्म करू नये. गवत कापू नये, झाडे तोडू नये, या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात. मकर संक्रांत हा आनंदाने गोड मानण्याचा दिवस आहे. या दिवशी शेतकरी बांधवांनी सुद्धा सुट्टी घ्यावी. नातेवाईक, मित्र परिवार यांच्याशी संवाद साधावा.
3) या दिवशी गाई म्हशीची दुधाची धार काढणं टाळावं, कारण दुधाला खूप किंमत आहे. वर्षभर आपण दुधाचे अनेक पदार्थ खातो हे सर्व दुधापासून बनलेलं असत. मकर संक्रातीच्या दिवशी संक्रमण होत असतं. त्याचा पंचमहाभूतांवर परिणाम होता. आणि याच गोष्टीचा आदर म्हणून संक्रातीच्या दिवशी या गोष्टी कारण टाळा. असं देखील आपले घरातले सांगतात.
The post सावधान.! मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी; अन्यथा वर्षभर भोगावे लागतील…. appeared first on Dainik Prabhat.
