मुंबई – आपल्यातील बहुतेक लोक बिअरच्या परिचयाचे असतील. बिअर पिणार्यांसाठी मजा नाही तर ती वाईट गोष्ट आहे. पण असे असले तरी बिअरची क्रेझ भरपूर आहे. बिअर पिणे फायदेशीर असल्याचेही लोक म्हणतात. पण आज आम्ही तुम्हाला बीअरचे फायदे किंवा तोटे सांगणार नाही. तर, बिअर पिल्यानंतर तुम्ही कोणते पदार्थ खायला पाहिजे की नाही याबद्दल सांगणार आहोत.
बिअरसोबत काही गोष्टींचे सेवन करण तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. होय.., काही लोक बिअरसोबत पिझ्झा, बर्गर, चिकन वगैरे खातात. मात्र, हे पदार्थ खाल्यानंतर तुमच्या शरीरावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. तर, जाणून घेऊयात बिअर पिताना किंवा प्यायल्यानंतर सुद्धा दोन तास कोणत्या गोष्टी खाऊ नयेत.
बिअर पिताना किंवा प्यायल्यानंतर ”या’ गोष्टी खाऊ नये…!
– बिअरसोबत कधीही मिठाई खाऊ नये. आरोग्यासाठी ही गोष्ट अत्यंत हानिकारक असते. मिठाई खायचीच असेल तर बिअर आणि मिठाईमध्ये तब्बल दोन- तीन तासांचं अंतर असणे आवश्यक आहे.
– लोक बिअरसह खारट शेंगदाणे खातात, परंतु असे केल्याने आपल्या आरोग्यास हानी पोहोचू शकते. याचे सेवन केल्याने तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे झोपताना भरपूर प्रमाणात पाणी पिऊन झोपा.
– मसालेदार गोष्टी बिअरसोबत कधीच खाऊ नयेत. याचे सेवन केल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. याचे सेवन केल्याने पोटात जळजळ होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यासोबतच पोटाचे देखील गंभीर विकार होऊ शकतात.
– जर तुम्ही बिअरचे सेवन करत असाल तर त्यासोबत फ्रेंच फ्राईजसारख्या गोष्टींचे सेवन करू नका. याचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच, बिअर पिल्यानंतर 2 तास ब्रेड किंवा ब्रेड प्रॉडक्ट्सचे सेवन करू नका. असे केल्याने तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
The post सावधान.! बिअर पिताना किंवा प्यायल्यानंतर चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नका; अन्यथा शरीरातील सर्व अवयव आतून होतील खिळखळे appeared first on Dainik Prabhat.