Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सावधान.! थायरॉईडच्या रुग्णांनी चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नयेत, अन्यथा होईल मोठा धोका….

by
July 21, 2023
in आरोग्य वार्ता
A A
सावधान.! थायरॉईडच्या रुग्णांनी चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नयेत, अन्यथा होईल मोठा धोका….
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – आजकाल वजन वाढायला लागले की, डॉक्‍टर थायरॉईडची तपासणी करण्याचा सल्ला देतात. कारण अचानक वाढणाऱ्या वजनाच्या मुळाशी थायरॉईड असू शकते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. पण योग्य आहार तुमचे या आजारापासून रक्षण करु शकतो.

थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे असते.

बद्धकोष्ठता (संडासला साफ न होणे), शरीराचं वजन अचानक कमी जास्त होणे, हात पाय थंड पडणे, त्वचा कोरडी पांढरी पडणे, ताणतणाव वाटणे, आळशीपणा येणे, शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे, केस गळणे ही थायरॉईडची लक्षणे आहेत.

दरम्यान, अशा परिस्थितीत तुम्हाला खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण काही पदार्थांच्या सेवनाने थायरॉईडचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर काही पदार्थांचे सेवन टाळणे उत्तम ठरते.

थायरॉईडची समस्या असेल तर सोयाबीन, कोबी, ब्रोकोली, पनीर, बटर, जंक फूड, कॉफी यांचे आहारातील प्रमाण कमी करा.
नियमित तपासणी करून वैद्यच्या सल्ल्याने आहार, औषधे घ्यावीत. एक नक्की जर आहार व जीवनशैली व्यवस्थित केली तर थायरॉईडपासून नक्की सुटका होऊ शकते.

ज्या भाज्यांमध्ये जास्त फायबर असते अशा भाज्या आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात. पण थायरॉईडच्या रुग्णांनी फायबर युक्त भाज्यांचे सेवन करू नये हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यांचे सेवन केल्याने थायरॉईडची समस्या वाढू शकते, तसेच पोटाशी संबंधित त्रासही होऊ शकतो. म्हणूनच बीन्स, तंतुमय भाज्या खाणे टाळावे.

जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर सोया प्रॉडक्ट्सचे चुकूनही सेवन करू नका. कारण याचे सेवन केल्याने थायरॉइडची समस्या वाढू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर सोयायुक्त पदार्थ गोष्टी खाणे टाळा. तसेच, थायरॉईडचा त्रास असेल तर प्रोसेस्ड फूडही खाणे टाळावे. कारण त्यामुळे थायरॉईडचा त्रास आणखीनच वाढू शकतो.

The post सावधान.! थायरॉईडच्या रुग्णांनी चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नयेत, अन्यथा होईल मोठा धोका…. appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar