FOOD POISONING : भगरीच्या पिठाच्या भाकरी आणि भगरीचा भात खाल्याने विषबाधा झाल्याच्या घटना वाढत आहे. सध्या भगर खाल्लाने विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. बीड, औरंगाबाद या ठिकाणी भगर खाल्लाने अनेक जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. उपवासाच्या दिवशी हमखास अनेक लोक भगरीचा भात आणि भाकरी बनवून खातात. अशावेळी भगरीमुळे विषबाधा होऊ नये या साठी काळजी घेणे आवश्यक आहे. तर जाणून घेऊया भगर खातांना काय काळजी घ्यावी.
भगरचे पीठ विकत घेताना कोणती काळजी घ्याल
-भगर खरेदी करताना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी.
-भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता, परवाना क्रमांक पॅकिंग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्यावी.
– तसेच मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करू नये. सुटी भगर व खुले भगर पीठ विक्रीसाठी ठेऊ नये.
भगर खाताना काय काळजी घ्याल
-भगर खरेदी केल्यानंतर ती घरी शिजवून खावी.
-जर भाकरी करायची असेल तर भगर घरीच दळावी. परंतु भगरीचे पीठ साठवून ठेवू नये अथवा सकाळी केलेली भगर रात्री खाऊ नये.
– जर भगरीचे पीठ घरी दळले तर ते घरात व्यवस्थित झाकून ठेवले पाहीजे. कारण ते पीठ तीन दिवसांत खराब होते. दळलेल्या भगरीच्या पिठाला पावसाळ्याच्या बुरशी लागते यातून विषबाधा होते.
– यासोबतच भगरीचे मोकळे पीठ विकत मिळते. ते विकत घेऊ नये. घरी सकाळी तयार केलेली भगरीची भाकरी संध्याकाळी खाऊ नये, रात्रीची शिळी भगर खाऊ नये विषबाधा होण्याची दाट शक्यता असते.
The post सावधान…! तुम्ही सुद्धा भगर खाताय तर, अशी घ्या काळजी नाही तर होईल ‘विषबाधा’ appeared first on Dainik Prabhat.