एका शोधाप्रमाणे आपण एका तासात पंधरा वेळा आपल्या चेहर्याला स्पर्श करता. चेहर्याला वारंवार स्पर्श केल्याने व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कारण डोळे आणि तोंडाच्या माध्यमाने व्हायरस शरीरात प्रवेश करतो.
हँड ग्लव्स घालून आपण ही सवय सोडण्याचा प्रयत्न करू शकता.
स्वतः:ला निरंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की आपल्याला चेहर्यावर हात लावणे टाळले पाहिजे.
घरात आपण जिथे वारंवार जात असता तिथे नोट्स लिहून चिकटून द्या.
आपले हात व्यस्त ठेवा, जसे टीव्ही बघत असताना हातात काही वस्तू धरून बसा किंवा इतर काही काम सोबत करत राहा.
सेंटेड मॉइश्चराईजर किंवा हँड वॉश वापरा, ज्याने चेहर्याकडे हात वळले की आपोआप दूर करण्याचं लक्षात येईल.
डोळ्यांकडे हात सतत वळत असतील तर घरात प्लॅन ग्लासेस घालून ठेवा.
हाताची घडी करून बसल्याची सवय लावा.
आपल्या बोटांवर बँडेज लावून ठेवा ज्याने करून चेहर्याला स्पर्श करण्यापूर्वी लक्षात येईल.
The post सावधान ! चेहर्याला वारंवार स्पर्श केल्याने होऊ शकतो मोठा धोका appeared first on Dainik Prabhat.