Thursday, August 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

समस्या आणि निवारण… करोना लाटेतील गर्भवती स्त्रिया

by प्रभात वृत्तसेवा
June 28, 2021
in आरोग्य वार्ता
A A
समस्या आणि निवारण… करोना लाटेतील गर्भवती स्त्रिया
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

करोना संक्रमणाची दुसरी लाट पहिल्या लाटेहून अधिक धोकादायक ठरत असल्याचे दिसून आले. या अगोदरच्या लाटेमध्ये वयोवृद्ध रुग्णांची संख्या अधिक होती. परंतु यावेळी मात्र लहान मुलं, तरुण आणि गर्भवती महिला यांची संख्या दिसून आली. सर्व सामान्य नागरिकांपेक्षा गर्भवती स्त्रियांना जरा जास्त लक्ष देण्याची गरज असते कारण एक नव्हे तर दोन जीवांची काळजी असते.

सामान्यतः गर्भवती महिलांना तीव्र स्वरूपाचा कोविड होण्याची संभावना खूप कमी असते, असे आजपर्यंतच्या अभ्यासात दिसून आले आहे. परंतु मधुमेह, रक्‍तदाब, हृदय रोग, अस्थमा, जास्त वजन, अशा व्याधी पहिल्यापासूनच आहेत.

अशा गरोदर महिलांना गंभीर स्वरूपाचे करोना संक्रमण होऊ शकते व 1.5 टक्‍के रुग्णांना आयसीयूमध्ये ऍडमिट करण्याची गरज पडू शकते. अद्यापही गर्भवती मृत्युदर अत्यल्प 0.2 टक्‍के इतकाच आहे.

लक्षणे कोणती?
करोनाची लागण झालेल्या गरोदर महिलेला ताप, धाप लागणे, सर्दी, खोकला, घसा, जुलाब, डोकेदुखी, श्‍वास घेण्यास त्रास अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास, घशातील स्त्रावाची (आरटीपीसीआर) तपासणी करून कोविडचे निदान केले जाते. एखादी गर्भवती महिला करोना पॉझिटिव्ह आली अथवा लक्षणे दिसल्यास घाबरून जाऊ नये, तात्काळ आपल्या स्त्रीरोग-प्रसूती तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

गर्भावर होणारे परिणाम
महिला गरोदर असते तेव्हा तिच्या शरीरातील प्रतिकारशक्‍ती कमी झालेली असते, त्यामुळे सौम्य, मध्यम व तीव्र स्वरूपाचा कोविड-19 आजार होऊ शकतो. सर्वच पॉझिटिव्ह गर्भवती महिलांना ऍडमिट व्हावे लागत नाही. लक्षणे सौम्य प्रकारची असतील तर 14 दिवस घरीच अलग राहून उपचार घेता येतात.

सर्वसामान्य महिलांना जे उपचार दिले जातात ते सर्व उपचार गरोदरपणातही करता येतात. बाळावर या संसर्गाचा जास्त काही परिणाम होत नाही. नाळेद्वारे, प्रसव मार्गातून अथवा स्तनपानातून बाळास करोना संसर्ग होत नाही, असे आढळून आले आहे. त्यामुळे विनाकारण गर्भपात करावा लागत नाही.

आजवर असे आढळले आहे की, गर्भारपणात करोना संसर्ग न्यूमोनिया मध्यम प्रकारचा व बरा होणारा होतो. तसेच लवकर प्रसूती होणे, गर्भपात होणे, गर्भ खराब होणे, मृतबाळ, कमी वजन, रक्‍तदाब वाढणे अशा काही गोष्टी खूप अल्पशा प्रमाणात तज्ज्ञांना दिसून आल्या आहेत.

कोविड संक्रमित गर्भवती महिलेची डिलिव्हरी सामान्य प्रकारे केली जाते, केवळ गंभीर संक्रमण झाले व गुंतागुंत झाली तर परिस्थितीचा विचार करून लवकर शस्त्रक्रिया करून डिलिव्हरी अथवा गर्भपात करावा लागतो. करोनामुळे प्रसूती प्रक्रियेत अथवा डिलिव्हरी करण्याच्या पद्धतीमध्ये कोणताही फरक पडत नाही. त्यामुळे घाबरून न जाता आपलं मनस्वास्थ्य योग्य राखून करोनाशी सामना करावा.

घरी उपचार
शरीरात करोना विषाणूंचा संसर्ग एकूण चौदा दिवसांचा असतो. त्यानंतर तो स्वतःच नाहीसा होतो. गर्भवती महिलेची करोना ट्रीटमेंट संक्रमणाच्या तीव्रतेनुसार केली जाते. सौम्य प्रकारची लक्षणे असणाऱ्या रुग्णास ऍडमिट न करता घरी राहूनच लक्षणांनुसार औषध उपचार दिले जातात.

गर्भारपणातील सौम्य प्रकारच्या कोविड आजारासाठी घरी 14 दिवस अलग राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. सर्वसामान्य इतर रुग्णांप्रमाणेच करोनासाठीच्या रक्‍ताच्या तपासण्या, छातीचा सिटीस्कॅन, बाळाची सोनोग्राफी इत्यादी तपासण्या केल्या जातात. हृदयाची गती, श्‍वसनाचा वेग, ब्लड प्रेशर, शरीरातील ऑक्‍सिजनचे प्रमाण, बाळाचे ठोके यावर नियमित लक्ष ठेवले जाते.

गंभीर पॉझिटिव्ह गर्भवती महिलांनी कधी आयसीयूमध्ये भरती व्हावे?
 1) श्‍वसन वेग 22 ते 25 प्रति मिनिटपेक्षा जास्त. 2) ऑक्‍सिजन सॅच्युरेशन 90पेक्षा कमी. 3) फुफ्फुसातील न्यूमोनिया संसर्ग 50 टक्‍के पेक्षा जास्त असल्यास. 4) रक्‍तदाब अति कमी वा अती जास्त असल्यास. 5) बेशुद्धावस्था येत असल्यास. 6) सेफ्टीक शॉक, ऍक्‍युट ऑर्गन फेल्युअर अशा परिस्थितीत तात्काळ आयसीयूमध्ये रुग्णास ऍडमिट करावे लागते. परिस्थितीचा आढावा घेऊन गर्भपात अथवा डिलिव्हरी करण्याचा निर्णय चिकित्सक घेत असतात.

अतिदक्षता विभागात ऍडमिट गर्भवती महिलेस ऑक्‍सिजन, शिरेवाटे न्यूट्रिशन, ऑक्‍सिजन, शिरेवाटे अँटिबायोटिक्‍स, अझिथ्रोमाइसिन, शिरेवाटे रेमडेसिविर, ओसेलटामविर, रिटोनाविर, स्टिरॉइड्‌स, लो डोस अस्पिरिन, लोमॉलेक्‍युलर वेट हिपारीन, विटामिन्स अशा उपाययोजना गरोदरपणामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

डिलिव्हरी नंतर घ्यायची काळजी
सर्व सोयींनी युक्‍त इस्पितळात सर्व प्रकारची करोना संरक्षण पीपीई किट घालून, काळजी घेऊन, बाळाची पूर्ण वाढ झाली असल्यास डिलिव्हरी केली जाते. प्रसूती प्रक्रियेत सामान्य स्त्रीप्रमाणेच पण कमी वेळेत डिलिव्हरी करावी लागते. जास्त माणसांचा संपर्क येऊ दिला जात नाही, परिस्थितीनुसार स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ नॉर्मल डिलिव्हरी अथवा सिजेरियन याचा निर्णय घेतात.

यावेळी स्पायनल अथवा एपिड्यूरल भूल जास्त सोयीस्कर असते. या प्रसूतीमध्ये बाळाची नाळ लवकर कापली जाते. प्रसूतीनंतर लगेच माता हात स्वच्छ करून, फेसमास्क लावून बाळाला स्तनपान करू शकते. मातेचा कोविड संसर्ग 14 दिवसांच्या आतील असेल तर बाळाला काही दिवस बाजूला ठेवावे लागते.

बालकास संसर्ग झाला आहे का? हे पाहण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. परंतु गर्भारपणात बाळाला करोना संसर्ग होतो याचा कोणताही पुरावा नाही. सध्या गरोदर स्त्रियांना व अंगावर पाजणाऱ्या महिलांना करोना लस देण्यासाठी सुरुवात झाली आहे.

– डॉ. संजय पंतबाळेकुंद्री

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar