Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सफरचंद घरात आणल्याबरोबर खराब होऊ लागतात? मग ‘अशा’ प्रकारे साठवा !

by
November 4, 2022
in आहार
A A
सफरचंद घरात आणल्याबरोबर खराब होऊ लागतात? मग ‘अशा’ प्रकारे साठवा !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

अनेकवेळा सफरचंद घरात आल्यावर दुसऱ्याच दिवसापासून ते खराब होऊ लागतात. हे टाळण्यासाठी खूप लोक सफरचंद फ्रीजमध्ये ठेवतात. पण फ्रीजमध्ये सफरचंदांवर तपकिरी डाग पडू लागतात आणि चवही बिघडते. वास्तविक, हे सफरचंदांच्या ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे होते. जेव्हा सफरचंद फ्रीजमध्ये ठेवतात. तापमान कमी झाल्यामुळे त्याचे एन्झाइम अधिक वेगाने काम करू लागतात. त्यामुळे सफरचंद अधिक पिकतात आणि त्यांची चवही खराब होते. म्हणूनच सफरचंद घरी आणल्यानंतर ते कसे ताजे ठेवावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

* सफरचंद फ्रिजमध्ये ठेवावे की नाही ?
सफरचंद फ्रीजमध्ये ठेवावे की नाही, असाही प्रश्न उपस्थित होतो. जर रेफ्रिजरेटरचे तापमान खूप कमी असेल तर सफरचंद खराब होऊ शकतात. कारण अनेकदा लोक सफरचंद फ्रीजमध्ये उघडून ठेवतात. जर तुम्हाला सफरचंद फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर ते प्लास्टिक किंवा कागदात गुंडाळा. असे केल्याने सफरचंदातील इथिलीन वेगाने वाढणार नाही आणि सफरचंद खराब होणार नाही. मात्र लक्षात ठेवा की सफरचंद लगेच कापून ठेवू नका किंवा उघडे ठेवू नका.

* सफरचंद कसे साठवायचे ?
सफरचंदांचे प्रमाण कमी असेल तेव्हाच ते फ्रीजमध्ये ठेवा. तसेच सफरचंद साठवण्यापूर्वी रेफ्रिजरेटरचे तापमान सामान्य ठेवा. सफरचंदांना फार कमी तापमानाची गरज नसते. तसेच, त्यातील आर्द्रता 90-95 टक्के असावी. प्रथम सफरचंद प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. ज्यामध्ये छिद्रे असतात आणि हवा सहज बाहेर येऊ शकते. जर तुम्ही प्लास्टिक वापरत नसाल तर सफरचंद काही कागदात गुंडाळा आणि टोपलीत ठेवा. लक्षात ठेवा की सफरचंद इतर भाज्यांसोबत अजिबात ठेवू नका.

* आपल्याकडे खूप सफरचंद असल्यास काय करावे?
जर घरात जास्त सफरचंद असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी अंधाऱ्या ठिकाणी ठेवा. जेथे तापमान थंड असेल. तसेच प्रत्येक सफरचंद काही क्राफ्ट पेपरमध्ये गुंडाळा. पेपर सफरचंदांना खराब होण्यापासून वाचवते. ही सर्व सफरचंद बास्केट किंवा ट्रेमध्ये ठेवा. सफरचंद कागदावर न गुंडाळता एकत्र ठेवल्यास सफरचंद लवकर खराब होतील. तसेच एखादे सफरचंद खराब झाले नाही ना हे वेळोवेळी तपासा. जर ते खराब दिसत असेल तर ते ताबडतोब काढून टाका. अन्यथा सर्व सफरचंद खराब होऊ लागतील.

* कापलेले सफरचंद असे ठेवा
कापलेले सफरचंद ठेवायचेच असेल तर त्याच्या तुकड्यांवर लिंबाचा रस पिळा. लिंबाच्या रसामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड सफरचंदांच्या ऑक्सिडेशन प्रक्रियेला रोखण्याचे काम करते. प्रथम कापलेले सफरचंद बाजूला ठेवा आणि एका भांड्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. नंतर कापलेले सफरचंद या पाण्यात टाकून ठेवा. साधारण ३ ते ४ मिनिटांनी काढून घ्या.

The post सफरचंद घरात आणल्याबरोबर खराब होऊ लागतात? मग ‘अशा’ प्रकारे साठवा ! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar