Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सतत रिल्स बघण्याने तुमच्या आरोग्यवर होऊ शकतो घातक परिणाम; पाहा काय सांगतात डॉक्टर !

by
May 31, 2023
in मानसिक आरोग्य
A A
सतत रिल्स बघण्याने तुमच्या आरोग्यवर होऊ शकतो घातक परिणाम; पाहा काय सांगतात डॉक्टर !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई – सोशल मीडियाचा वापर हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परंतु त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचे उत्तरप्रदेश बलरामपूर रुग्णालयाच्या अभ्यास समितीने सांगितले आहे. रिल्स पाहण्याच्या छंदामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातील 60 टक्के उत्साही निद्रानाश, डोकेदुखी, मायग्रेन यासारख्या समस्यांनी त्रस्त झाले आहेत.

झोप लागली तरी रिल्सचेच स्वप्ने पडतात. असे अभ्यास समितीकडून सांगण्यात आले आहे. रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य अभ्यास समितीने ओपीडीमध्ये आलेल्या दीडशे रुग्णांवर अभ्यास केला. सहा महिन्यांच्या अभ्यासात 10 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील मानसिक रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 30 महिलांचा देखील समावेश होता.

दीड वर्षांहून अधिक काळ रिल्स पाहत असल्याची रुग्णांनी दिली कबुली…

डॉक्टरांच्या माहितीनुसार, ‘बहुतांश रुग्णांनी दीड वर्षांहून अधिक काळ रील पाहण्याची कबुली दिली आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण सोशल साईट्सवर रिल्स पाहतो.

सलग अर्धा तास रील पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक बोलत होते. विशेष म्हणजे या रुग्णांनी त्यांचा कोणताही व्हिडीओ किंवा रील सोशल साइटवर शेअर केला नाही. फक्त दुसऱ्याचे रिल्स बघायची सवय त्यांना होती’.

रिल्स बघितल्याशिवाय झोप येत नाही…

अभ्यासात समाविष्ट केलेल्या 150 लोकांपैकी 30 जणांनी असे सांगितले की, जेव्हा त्यांना मोबाइलवर रील पाहण्याची संधी मिळत नाही किंवा कोणत्याही कारणामुळे ते पाहू शकत नाहीत तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटते. डोकेदुखी, कोणतेही काम करता येत नाही अशी स्थिती आहे.

अनेक प्रसंगी त्याच्या ब्लड प्रेशर वर परिणाम होतो. तसेच त्यातील 20 टक्के रुग्णांनी केवळ दिवसाच नव्हे तर रात्री झोप मोडल्यानंतरही रील पाहण्याची तक्रार केली. 10 ते 15 मिनिटे रील पाहिल्याशिवाय त्यांना झोप येत नसल्याचे रुग्णांनी सांगितले.

दरम्यान, अभ्यासात सहभागी 60 टक्के लोकांचा असा विश्वास होता की निद्रानाशामुळे दिनचर्येवर परिणाम होतो. त्याचा परिणाम नोकरी आणि अभ्यासावरही होताना दिसत आहे.

The post सतत रिल्स बघण्याने तुमच्या आरोग्यवर होऊ शकतो घातक परिणाम; पाहा काय सांगतात डॉक्टर ! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar