Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सडपातळ कंबरेसाठी महावीरासन – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
May 25, 2022
in आरोग्य वार्ता
A A
सडपातळ कंबरेसाठी महावीरासन – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

महावीरासन हे एक अतिशय सोपे आणि अत्यंत लाभदायक आसन आहे, महावीरासन हे दंडस्थितीतील म्हणजे उभे राहून करावयाचे एक आसन आहे. या आसनात शरीराची अवस्था महावीर बजरंगबली वीर हनुमानाप्रमाणे होते. म्हणूनच याला महावीरासन म्हटले आहे. महावीरासन करायला अतिशय सोपे आहे. प्रथम दंड स्थितीत उभे रहावे, भरपूर श्‍वास घ्यावा, मग श्‍वास रोखून डावा किंवा उजवा पाय जेवढा जास्ती जास्त लांब टाकता येईल तेवढा टाकावा. साधारण अंदाजे तीन फूट पुढे नेला तरी चालेल. मग दोन्ही हातांच्या मुठी बंद कराव्या आणि हात कोपरामध्ये दुमडून वर हवेत न्यावेत, जणू काही फार मोठे वजन उचलत आहोत, अशी अवस्था हातांची करावी. हे आसन एकदा डावा पाय पुढे घेऊन करावे व एकदा उजवा पाय पुढे घेऊन करावे. आसन सोडताना सावकाश श्‍वास सोडावा, हळूहळू पुढे घेतलेला पाय मागे घ्यावा.

जर हे आसन भरभर केले, तर त्याचा फायदा अधिक होईल. पाय पुढे मागे उजवीकडून आणि डावीकडृून जलद करावे. या आसनाचे फायदे अनेक आहेत. या आसनामुळे उंची वाढायला मदत होते. हातपाय बळकट होतात. पोट साफ आणि हलके होते. छाती भरदार होते. शरीर तेजस्वी आणि मजबूत बनते. महावीरासनामुळे कंबरेला ताण बसतो आणि कंबरेभोवतीचे सर्व स्नायू लवचिक बनतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. आपली प्रकृती उत्तम राखण्यासाठी महावीरासन नियमित करावे. स्त्रियांनीसुद्धा हे आसन नियमित करावे. यामुळे पोटाचे विकार बरे होतात. मासिक पाळीतील आरोग्य सुधारते. हातापायातील रक्‍ताभिसरण चांगल्या प्रकारे होऊन हातापायांची हाडे मजबूत होतात. या आसनाचा कालावधी हवा तेवढा ठेवता येतो. कारण हे करायला सोपे आसन आहे.

हाताच्या पंजांच्या मुठी आवळल्यामुळे बोटांचे कार्य सुधारते. तेथील स्नायूंना आणि हाडांना बळकटी येते. आसनस्थिती घेतल्यानंतर श्‍वास घेऊ नये आणि सोडूही नये. म्हणजेच श्‍वास रोखून कुंभक करावे. आसन सोडताना श्‍वास सोडत नेहमीप्रमाणे संथ श्‍वसन करावे. हे आसन करताना मागचा पाय थोडासा उचलला जातो. महावीरासनामुळे पुरुषांची संभोगशक्‍ती वाढते, स्त्रियांचा योनीमार्ग खुला होतो तसेच ज्या स्त्रियांची मासिक पाळी काही कारणामुळे वयात असताना बंद झाली असेल, त्यांची मासिक पाळी या आसनामुळे सुरू होते. हे आसन नियमित केले असता बुटक्‍या लोकांची उंची वाढण्यास मदत होते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar