पुणे – सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय महत्व पूर्ण आहे. हिंदू श्रद्धेनुसार या दिवशी भगवान शिवशंकर आणि पार्वतीची पूजा करणाऱ्या भक्तांना आनंदी, शांती आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद मिळतो.
त्यांची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. श्रावण शिवरात्री 2021 हा श्रावण महिन्यातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस आहे. या दिवशी शिवभक्त एक दिवसाचा उपवास करतात आणि समृद्ध जीवनासाठी भगवान शंकराची पूजा करतात.
तर श्रावणातील आज दुसरा सोमवार आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत खास आणि मांगल्यमय आहे. श्रावणात सोमवारी अभिषेक करण्याला विशेष महत्त्व असते.
अशी करा श्रावणी सोमवारी भगवान शंकराची पूजा…
- श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा
- त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करुन पूजा करावी.
- एका थाळीत शंकराची पिंड ठेवावी, त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा
- त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावे, दिवा लावला
- पूजा करत असताना “ॐ महाशिवाय सोमाय नम:” किंवा “ॐ नम: शिवाय” या मंत्राचा जप करावा
- त्यानंतर शिवलिंगावर त्या त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी.
- धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरुन वाहावी, ही शिवामूठ वाहताना पुढील मंत्र म्हणावा- नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने । शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।
- तसेच, शिवामूठ वाहताना “शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा” असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी.
- त्यानंतर शंकराची आरती म्हणावी आणि शंकराकडे सुख-समृद्धीची प्रार्थना करावी
- दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा