पुणे – सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय महत्व पूर्ण आहे. हिंदू श्रद्धेनुसार या दिवशी भगवान शिवशंकर आणि पार्वतीची पूजा करणाऱ्या भक्तांना आनंदी, शांती आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद मिळतो.
त्यांची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. श्रावण शिवरात्री 2021 हा श्रावण महिन्यातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस आहे.
या दिवशी शिव भक्त एक दिवसाचा उपवास करतात आणि समृद्ध जीवनासाठी भगवान शंकराची आणि पार्वतीची पूजा करतात. श्रावणात सोमवारी अभिषेक करण्याला विशेष महत्त्व असते. यंदाचा श्रावण महिना येत्या सोमवार (दि. 9) पासून सुरु होणार आहे.
अशी करा ‘श्रावण शिवरात्री’ची पूजा…..
- श्रावण शिवरात्री पूजा मध्यरात्री केली जाते. ही पूजा निशिता काल नावाने ओळखली जाते. म्हणून पूजा सुरू करण्यापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला.
-
शिव मंदिरात जाऊन गंगा जल तसेच दूध, तूप, मध, दही, सिंदूर, साखर, गुलाब पाणी इत्यादी पवित्र जल अर्पण करून शिवलिंगावर अभिषेक करा. अभिषेक करताना “ओम नम: शिवाय’ या मंत्राचा जप करत रहा.
-
चंदनाने टिळा लावा आणि धतुरा, बेलाची पाने आणि अगरबत्ती लावा.
शंकराला पाणी खूप आवडते. मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो.
-
तसेच पूजा करताना शिवलिंगावर मध देखील वाहा मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो.
-
महामृत्युंजय मंत्र, शिव चालीसा आणि “ओम नम: शिवाय’चा 108 वेळा जप करा.
-
शेवटी भगवान शिव आणि देवी गौरीची आरती करून पूजा समाप्त करा.