सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. अनेक कलाकार लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. एकीकडे ही लग्नसराई सुरु असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळेनात..ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुलींना बिझिनेसमन, चांगल्या जॉबला असणारा, चांगला कमावता असणारा मुलगा पाहिजे पण शेतकरी मुलगा नको.. ह्याला कारण म्हणजे मुलींच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या वाढत्या अपेक्षा..
एकीकडे मुलींची संख्या कमी झाली आहे तर दुसरीकडे मुलांची वय वाढली तर त्यांना लग्नासाठी कोणी मुली देईनात.. आताच्या काळात सगळेच ऍडव्हान्स झाले आहेत. मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची अपेक्षादेखील मोठी असते. आपल्या मुलीचे पुढे चांगले व्हावे म्हणून प्रत्येक आई- वडील तिच्यासाठी चांगले स्थळ शोधून तिचे लग्न लावून देतात आणि मोकळे होतात..
पण गावाकडे शिकणाऱ्या मुलांची थोडी बिकट परिस्थिती आहे. काही मुलांना घरच्या गरिबीमुळे त्यांना चांगले शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे ते आपली घरची शेती करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. मात्र आजकालच्या मुलींना शहर म्हंटले कि चांगले जीवन आणि गाव म्हंटले कि कमीपणाचे वाटते. एवढेच नाहीतर गावाकडच्या मुलीदेखील शहरातील एक चांगले स्थळ बघतात आणि लग्न करतात पण त्यादेखील शेतकरी मुलाशी लग्न करत नाहीत..
ही अवस्था का झाली?
आज जर आपण पहिले अनेक शेतकऱ्यांकडे खूप जमीन आहे. मात्र त्याठिकाणी पाण्याची सोय नाही. त्यांच्या पिकाला हमीभाव नाही.. कधीकधी त्यांना निसर्गावरदेखील अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांची ही अवस्था असते. लग्नाला मुली भेटत नाही म्हणून गावाकडची मुले एमआयडीसीमध्ये १० ते १२ हजारावर काम करताना दिसतात. ते पण १२ – १२ तास.. फक्त आणि फक्त लग्नाला पोरी भेटाव्या म्हणून…
काही काही ठिकाणी तर लग्न व्हावे म्हणून मुलीच्या घरच्यांना भरमसाठ हुंडादेखील दिला जातो. काही वर्षांपूर्वी म्हणजे आपल्या आजोब- वडिलांच्या काळात मुलाच्या घरचे मुलीच्या घरच्यांकडून हुंडा घ्यायचे तर आता मुलीच्या घरच्यांना मुलांना हुंडा द्यावा लागत आहे. या सगळ्यात जे लग्न जमवण्यासाठी मध्यस्थी करतात त्यांची मात्र मोठी चंबळ होते.
या विषयावर भाष्य करणारे अनेक चित्रपटदेखील आले. यामध्ये पोस्टर गर्ल, बस्ता या चित्रपटांचा विशेष उल्लेख करावा लागेल.पोस्टर गर्लमध्ये लग्नाला पोरी न मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांची आणि गावाची व्यथा दाखवण्यात आली आहे तर बस्ता या चित्रपटामध्ये आपली मुलगी सुखात राहावी म्हणून हुंडा देणाऱ्या एका वडिलांची कथा दाखवण्यात आली आहे. जो आपल्या मुलीसाठी कर्ज काढून वाटेल तेवढा हुंडा द्यायला तयार असतो. दोन्ही चित्रपटातील विषय थोडे वेगळे असते तरी सध्या परिस्थितीला मिळते – जुळते आहेत..
बस्ता या चित्रपटामध्ये एक वाक्य आहे.. नोकरदाराशी लग्न करून नोकर म्हणून जगण्यापेक्षा मी एका शेतकऱ्याशी लग्न करून मालकीण म्हणून जगेल..असा विचार जर आताच्या पोरींनी केला तर हा प्रश्न सुटायला जास्त वेळ नाही लागणार आणि समतोल राखला जाईल…
The post ‘शेती’ हवी, पण ‘शेतकरी मुलगा’ नको! appeared first on Dainik Prabhat.