
शुभ प्रभात
June 3rd, 7:06amJune 1st, 3:18pm
प्रभात वृत्तसेवाlatest-news
सकाळी उठून काही लोक ध्यान करतात, काही व्यायाम करतात, काही मॉर्निंग वॉकला जातात. या सर्व सवयी आरोग्यदायी जीवनशैलीचा एक भाग आहेत. सकाळी लवकर उठणे ही चांगली सवय आहे. मात्र सकाळी उठल्यानंतरच्या अशा काही सवयी आहेत ज्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो.
एका सर्वेक्षणानुसार, दिवसाची सुरुवात आपल्या संपूर्ण दिवसाच्या आरोग्यावर परिणाम करते. जर तुमची दिवसाची सुरुवात ताजेपणाने भरलेली असेल, तर तुमचा दिवस चांगला जातो. मात्र, दिवसाच्या सुरुवातीला काही गोष्टी चुकीच्या केल्यास त्या सवयी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात.
झोपेतून उठल्यानंतर घरातील इतर ठिकाणी जाऊन झोपण्याची सवय चुकीची आहे. ज्यामुळे तुमची झोप पूर्ण झाल्यानंतरही तुम्हाला फ्रेश वाटत नाही. दिवसाची सुरुवात सकारात्मक असावी. एखाद्याबरोबर सकाळी उठून भांडणं योग्य नाही.
यामुळे तुमचा मूड दिवसभर खराब राहतो. त्यामुळे सकाळी भांडण करणं टाळा. सकाळी जास्त मसालेदार अन्न खाणे टाळावे. न आवडणाऱ्या लोकांशी सकाळीच बोलणे टाळावे. आवडत्या, प्रिय व्यक्तींशी सकाळी संवाद साधल्यास मन आनंदी होते.
डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा