error: Content is protected !!
रात्रीची चपाती सकाळी कडक होते, शिळे अन्न आरोग्यासाठी चांगले नाही या कारणास्तव शिळ्या चपात्या टाकून दिल्या जातात. खरं तर बारा ते चौदा तास आधी बनवण्यात आलेली चपाती ही हानीकारक नाही. त्याचे काय फायदे असू शकतात त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
ताज्या चपातीपेक्षा शिळी चपाती हेल्दी आहे. शिळ्या चपातीमध्ये अनेक पोषणमुल्ये आणि उर्जा ताबडतोब मिळते.
शिळ्या चपातीत कोलेस्ट्रॉल अजिबात नसते. त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम दूर होतात.
ब्लड प्रेशरच्या समस्येनं त्रस्त असाल तर शिळ्या चपातीला थंड दुधात १५ मिनिटं भिजवून खावं.
मधुमेही व्यक्तींनी सकाळच्या नाश्त्यामध्ये शिळी पोळी कुस्करून त्यात थंड दुध घालून खावं. पण साखर टाळावी.
अशक्तपणा जाणवत असेल तर शिळ्या चपातीचे सेवन करावे. यामुळे शरीरात शक्ती येईल.
याशिवाय उन्हाळ्यात शिळी दुधात भिजवून खाल्ल्यानं उष्माघाताचं त्रास कमी होतो.
रोज व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीचे काम करणाऱ्यांनी शिळ्या चपातीचं सेवन करावं. यामुळे त्वरित ऊर्जा मिळते.
अॅसिडीटी, गॅस आणि पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी शिळी चपाती खावी. गव्हाच्या पोळीमध्ये असणारे फायबर अन्न पचनासाठी देखील उपयुक्त आहे.
error: Content is protected !!
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar