Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

शारीरिक हालचाली मंदावल्याने समस्या – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
September 24, 2021
in आरोग्य वार्ता
A A
शारीरिक हालचाली मंदावल्याने समस्या – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

काही प्रमाणात लहान मुलांमध्येही मणक्‍याच्या आजारात वाढ झाल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. “वर्क फ्रॉम होम’ करणारे नोकरदार आणि “स्कूल फ्रॉम होम’ (ऑनलाइन शाळा) करणारे विद्यार्थी या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी आहे.

करोनामुळे वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळेला दीड-पावणेदोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटून गेला आहे. त्यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्याने अनेकांना मणक्‍याच्या वेदना जाणवत आहेत. जास्तकाळ एकाच ठिकाणी बसून राहणे, बदलती जीवनशैली, पौष्टिक आहाराचा अभाव हे या मागील मुख्य कारणे आहेत.

लॅपटॉप, टॅब हे प्रकार कोठेही बसून कशाही “पोझिशन’मध्ये बसून मुले पहात असतात. कधी झोपून तर कधी चुकीच्या पद्धतीने बसलेले असतात. त्यामुळे अनेक लहान मुले सध्या सांधेदुखी आणि मणक्‍याच्या विकाराने त्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रौढ व्यक्‍ती, नोकरदार यांच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी साधारणपणे 8 ते 20 वयोगटातील मुलांना हा त्रास जाणवत आहे.

करोना संसर्गापासून वाचण्यासाठी घरूनच ऑफिसचे काम करणाऱ्यांची संख्या आयटी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी आहे. परंतु, बसण्याच्या योग्य पद्धतीसाठी आवश्‍यक खुर्च्यांचा अभाव असणे, शारिरीक हालचालीच्या अभावामुळे पाठदुखीसारख्या समस्या भेडसावत असलेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेनंतर अवघ्या सहा महिन्यांतच 8 ते 20 वर्षे वयोगटातील पाठदुखीच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तर 25 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्‍तींमध्ये चारपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

आयटी प्रोफेशनल्समध्ये पाठदुखीच्या समस्या घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. “वर्क फ्रॉम होम’मध्ये जास्त तास काम केले जाते. कामाचा ताणही वाढला आहे. नोकरीच्या ठिकाणी “डिव्होटेड टायमिंग’ मिळते, याशिवाय काही कंपन्यांमध्ये माइंड गेम, स्वीमिंग किंवा एखाद्या खेळाचे डेस्क “रीलॅक्‍सेशन’साठी ठेवतात. बहुतांश आयटी पार्कमध्येही ती सोय आहे. त्यामुळे हा व्यायाम किंवा “रिलॅक्‍सेशन’ घरी मिळत नाही. याशिवाय व्यायामाचाही अभाव दिसतो. लहान मुलांमध्ये तुलनेने ही समस्या फारशी दिसत नाही.
– डॉ. अमोल रेगे,
मणकेविकार तज्ज्ञ

काय करावे आणि काय करू नये
जास्त तास अंथरुणावर विश्रांती घेऊ नका. कारण, शरीर कडक होऊ शकते, उठणे, उभे राहणे आणि पाठदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी ते ताणणे आवश्‍यक आहे. शर्करायुक्त, प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थांचे सेवन करणे शक्‍यतो टाळावेत, ताजी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य खाऊ शकतात. पाठदुखी कमी करण्यासाठी आहारात कांदा, बेरी, आले, हळद आणि लसूण यांचा समावेश करा. ऑनलाइन अभ्यास आणि ऑफिसचे काम करताना योग्य जागेची निवड करा, शक्‍यतो डेस्क किंवा खुर्चीचा वापर करा. पाठ दुखत असल्यास जड वस्तू उचलणे टाळावे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar