[[{“value”:”
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात डेंग्यु आजाराच्या निदानासाठी एकुण तीन हजार २ संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये २३ रुग्णांना डेंग्यु झाल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये ११ पुरुष व १२ महिलांचा समावेश आहे.
सध्या पावसाळा सुरु असून डेंग्युची साथ पसरत असल्याचे चित्र आहे. आकुर्डी येथे एकाच घरातील ५ जणांना डेंग्युची लागण झाली आहे. तशा बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर आकुर्डी येथील विवेकनगर परिसरातील रहिवाशी सोसायटी मधील ३ रुग्णांना डेंग्यु झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय विभागाकडून कळविण्यात आले आहे. रुग्णांचा डेंग्यु चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
वैद्यकीय विभागामार्फत आकुर्डीतील रहिवाशी सोसायटी व शेजारील रहिवाशी सोसायटी परिसरात किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यांच्या शेजारी बांधकाम साईट असून त्याठिकाणी डेंग्यु आजारास कारणीभुत असलेल्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. या ठिकाणी औषध फवारणी, औष्णीक धुरिकरण करुन डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले. संबंधित बांधकामावर दंडत्मक कारवाई करुन १० हजार रुपये दंड वसूल केला आहे.
वैयक्तीक खबरदारी घ्यावी
काही रुग्णांमध्ये या दरम्यान रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अत्यवस्थ होतो. रुग्ण बेशुध्द होऊ शकतो या गंभीर बेशुध्द अवस्थेला डेंग्यु शॉक सिंड्रोम असे म्हणतात. यामध्ये मृत्युचे प्रमाण जास्त असते. डेंग्यु आजाराचा प्रसार डास चावल्याने होतो. यामुळे आपले घर व नजिकच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. याकामी घरात व आजुबाजुच्या परिसरात पाणी साचून रहणार नाही, याची दक्षता घ्यावी. घरातील कचऱ्याची व टाकाऊ वस्तुंची योग्य विल्हेवाट लावावी. आपल्याला डास चावणार नाहीत, याची वैयक्तित खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
ही लक्षणे आढळल्यास घ्या उपचार
– तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी
– उलट्या होणे, डोळयांच्या आतील बाजुस दुखणे
– अंगावर पुरळ, अशक्तपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे
– त्वचेखाली, नाकातुन रक्तस्त्राव होणे व रक्ताची उलटी होणे. रक्तमिश्रीत किंवा काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, हातपाय थंड पडणे
The post शहरात २३ जणांना डेंग्यु, तापाचे रुग्ण वाढले appeared first on Dainik Prabhat.
“}]]