Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

शरीरावर काय होतो ॲनेस्थेशियाचा परिणाम? कुठले असतात प्रकार? वाचा सविस्तर

by
October 20, 2022
in आरोग्य वार्ता
A A
शरीरावर काय होतो ॲनेस्थेशियाचा परिणाम? कुठले असतात प्रकार? वाचा सविस्तर
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

शस्त्रक्रिया म्हटली की बऱ्याच रुग्णांना भीती वाटते ती शस्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या वेदनांची. शस्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या वेदना शमवण्याचं काम भूलतज्ज्ञ करत असतो. म्हणूनच शस्त्रक्रिया यशस्वी होण्यामध्ये भूलतज्ज्ञाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

जगात सर्वप्रथम 16 ऑक्‍टोबर 1846 रोजी रुग्णाला इथर या औषधाचा वापर करून यशस्वीपणे भूल देण्यात आली. 1846 पासून आजपर्यंत आमूलाग्र बदल या भूलशास्त्रात झाले आहेत. अनेक इथर, क्‍लोरोफॉर्म सारखी औषधे इतिहास जमा झाली आहेत. बरीच नवीन आणि सुरक्षित असणारी नवनवीन औषधे आज वापरण्यात येतात. नवनवीन औषधे, यांत्रिक उपकरणे आणि पद्धती यांच्या साह्याने भूलशास्त्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. परंतु या शास्त्राबाबत म्हणावी तेवढी जनजागृती अजूनही नाही.

16 ऑक्‍टोबरला जागतिक ऍनेस्थेशिया दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वेदनारहित प्रसूतीबद्दल जाणून घेऊया. स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे मातृत्व. मातृत्व हे गुलाबासारखे असते, जसे गुलाब आला की त्यासोबत काटे येतात तसेच मातृत्व आले की वेदना आली असा समज आहे. प्रसूतीच्या वेदना सोसल्याशिवाय आई होता येत नाही किंवा प्रसूतीच्या प्रक्रियेत वेदना असतातच त्या सहन केल्याशिवाय मातृत्व मिळत नाही, असा समज आहे. प्रसूतीच्या काळात स्त्रीला असह्य वेदना होतात. प्रसूती तिच्या आयुष्यातली एवढी कठीण गोष्ट असते की प्रसूती म्हणजे आईचा पुनर्जन्मच मानला जातो.

वैद्यकीय क्षेत्रातील झालेल्या प्रगतीमुळे वेदनारहित प्रसूती करणे शक्‍य झाले आहे. प्रसूतीच्या वेळी बधिरीकरणशास्त्र योग्य पद्धतीने वापरले जाऊ शकते व वेदनारहित प्रसूती शक्‍य होऊ शकते. परंतु या संदर्भातील माहिती सामान्यांपर्यंत पोहचली नसल्याने या बाबत जनमाणसात अनेक गैरसमज आहेत. वेदनारहित प्रसूती हा स्त्रीच्या जीवनातील अतिशय सुखाचा, वेदनारहित, सुरक्षित, अविस्मरणीय असा प्रसंग राहू शकतो याची जाणीव अद्यापही कित्येकांना नाही.

प्रसूतीच्या वेदना या गर्भाशयाच्या होणाऱ्या आकुंचनामुळे जाणवतात. या आकुंचनामुळे बाळ खाली प्रसवमार्गामध्ये ढकलले जाते आणि गर्भपिशवीचे तोंड उघडू लागते. वेदनारहित प्रसूतीसाठी जास्त प्रचलित असलेली पद्धत म्हणजे एपीड्युरल नालजेसिया. मज्जारज्जूवर असलेल्या आवरणाच्या बाहेरील पोकळीस एपीड्युरल स्पेस असे म्हणतात. एपीड्युरल स्पेसमध्ये मज्जारज्जूपासून निघणारे मज्जातंतू असतात. एपीड्युरल नालजेसिया देताना भूलतज्ज्ञ मणक्‍यांमधील जागेतून सुई टाकतात आणि त्या सुईमधून एक बारीक नाळी आत सोडतात, त्यातून स्थानिक बधीरके या स्पेसमध्ये सोडण्यात येतात. या बधीरकांमुळे मज्जातंतू बधीर होतात. थोडक्‍यात काय तर एपीड्युरल नालजेसियामध्ये प्रसूतीच्या कळा निर्माण करणारी यंत्रणा बधीर केली जात नाही तर मेंदूपर्यंत संवेदना पोहचवणारी यंत्रणा बधीर केली जाते म्हणजेच प्रसूती कळा चालूच राहतात परंतु वेदना जाणवत नाहीत.

प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदनांमुळे शरीरात बरेचसे रासायनिक बदल होत असतात. हे बदल गर्भाशयाला होणारा रक्‍तपुरवठा कमी करतात ज्यामुळे बाळाला होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी होतो. पर्यायाने बाळाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. वेदनारहित प्रसूतीमध्ये हा धोका टाळता येऊ शकतो. वेदना कमी झाल्याने रुग्ण तणाव मुक्‍त होऊन चांगल्या प्रकारे सहकार्य करते आणि तिचा बाळंतपणाच्या प्रक्रियेतला सहभाग वाढून येणाऱ्या बाळाची ती उत्साहानं वाट पाहू लागते. एकंदरीत सर्व बाबींचा विचार केला असता वेदनारहित प्रसूती ही आई होण्याचा सुखद अनुभव देण्यात, तसेच आई व बाळ या दोघांच्याही जीवाला होणारे धोके कमी करण्यात मदत करेल यात शंकाच नाही परंतु यासाठी प्रसूतीतज्ज्ञ आणि बधिरीकरण तज्ज्ञांचा सहभाग व समन्वय आवश्‍यक आहे. तसेच गर्भवती स्त्रीसोबत त्याच्या जोडीदाराची साथ तितकीच आवश्‍यक आहे.

वेदनारहित प्रसूतीसाठी स्त्रीला प्रोत्साहित करण्याकरिता तज्ज्ञांचा जेवढा सहभाग आवश्‍यक आहे तेवढाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त सक्रिय सहभाग तिच्या पतीचा तसेच इतर नातेवाईकांचाही असायला हवा. या सगळ्यावर वेदनारहित प्रसूतीचे यश अवलंबून आहे. वेदनारहित प्रसूतीसाठी काही खर्च लागतो परंतु वेदनारहित प्रसूतीमुळे मिळणारा मातृत्वाचा सुखद अनुभव हा पैशात न मोजता येणारा आहे. वेदनारहित प्रसूतीबद्दल अधिकाधिक जनजागृती होणे आवश्‍यक आहे जेणेकरून हा सुखद अनुभव जास्तीत जास्त महिलांना मिळू शकेल.

 

 

The post शरीरावर काय होतो ॲनेस्थेशियाचा परिणाम? कुठले असतात प्रकार? वाचा सविस्तर appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar