Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

शरीरात तारुण्याचा जोम आणणारे चक्रासन – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
October 27, 2021
in आरोग्य वार्ता
A A
शरीरात तारुण्याचा जोम आणणारे चक्रासन – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

चक्रासन हे शयनस्थितीतील आसन आहे. ज्यामध्ये शरीराची कमान होते. जी चक्राकार असते. शरीराला चक्राप्रमाणे आकार देणारे म्हणून या आसनाला चक्रासन म्हणतात. सुरूवातीला जमिनीवर उताणे झोपावे. दोन्ही गुडघे उभे करून पायांचे चवडे मांडीजवळ आणावे अथवा दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून सीटजवळ उभे करावे. दोन पायांमध्ये साधारणपणे तीन ते चार इंच अंतर घ्यावे. 

नंतर दोन्ही हात उचलून, तळवे उलटे करून डावा हात डाव्या खांद्याजवळ आणि उजवा हात उजव्या खांद्याजवळ न्यावा. हात जास्तीत जास्त आतल्या दिशेने न्यावेत. श्‍वास घेत कंबर मान उचलावी. खांद्यापासून गुडघ्यापर्यंतचे शरीर हात आणि पायावर तोलून शरीराची कमान करावी. जितकी कंबर जास्त उचलली जाईल तितका शरीराचा आकार चक्राकार होईल. आसन पूर्ण होताच संथ श्‍वसन करावे. 

आसन सोडताना सावकाश श्‍वास घ्यावा. मग श्‍वास सोडत सोडत हात कोपरात वाकवून व पाय गुडघ्यात वाकवून खांदे, कंबर प्रथम जमिनीला टेकवावे. नंतर दोन्ही हात जे खांद्याखाली असतात ते काढावे आणि हाताचे तळवे जमिनीला टेकवावे. दोन्ही पाय शयनस्थितीत न्यावेत.

हे आसन तसे सुरूवातीला जास्त वेळ टिकवता येत नाही. पण सरावाने एक मिनिटापर्यंत या आसनात रहाता येते. पाय गुडघ्यात सरळ करणे आणि दोन्ही हात कोपरामध्ये सरळ करणे हे या आसनात महत्वाचे आहे. हे आसन करताना चेहऱ्यावर कमीत कमी ताण आणण्याचा प्रयत्न करावा. तोंड मिटून नाकानेच श्‍वसन करावे.

पाठीचा कणा या आसनात अधिक प्रमाणात वाकवला जातो. या आसनात पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढते कारण त्याला उलटा ताण मिळतो. त्यामुळे 33 मणक्‍यांना चांगला व्यायाम होतो व त्यांची कार्यक्षमता निश्‍चितच वाढते. पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो व पोटातील ग्रंथीवर दाब आल्यामुळे पचनक्रिया सुधारते, अतिरिक्‍त चरबी घटते. हात आणि पाय दोन्हींवर खांद्यापासून गुडघ्यापर्यंत तोलले जाते. त्यामुळे हातापायांच्या स्नायूंना बळकटी येते.

मांड्या आणि पोटऱ्यांचे स्नायू लवचिक होतात. या आसनात मागे वाकल्यामुळे पाठीच्या कण्यांचे विकार होत नाही. तसेच जर खांदा लचकला असेल अथवा अवघडला असेल किंवा दु:खत असेल तर चक्रासन केल्यामुळे लगेच आराम वाटतो. ज्यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे वा मोठी ऑपरेशन्स्‌ झाली आहेत त्यांनी डॉक्‍टरांना विचारून हे आसन करावे.

या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो. त्यामुळे शरीरात उत्साह संचारतो. सर्वांगासनाला हे आसन पुरक आहे. वृद्धत्व कमी करून तारूण्याचा जोम आणणारे चक्रासन प्रत्येकाने नियमित केले पाहिजे. हे आसन केले असता विपरित शयनस्थितीतील, धनुरासन, भुजंगासन आणि शलभासनाचे फायदे मिळतात. जे लोक चक्रासन करतात त्यांची म्हातारपणी कंबर वाकत नाही.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar