Saturday, March 7, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

शरीरातील पेशींची कार्यक्षमता वाढवणारे मृदंगासन – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
September 26, 2021
in आरोग्य वार्ता
A A
शरीरातील पेशींची कार्यक्षमता वाढवणारे मृदंगासन – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मृदंगासन हे आसन दंडस्थितीतील आसन आहे. या आसनाला कोणीकोणी मुद्रा मानतात. हटयोगात मृदंगबंध म्हणून वर्णन आहे पण त्याचा आणि या आसनाचा तसा संबंध नाही. अर्वाचिन ग्रंथात याची नोंद आहे.

हे आसन करायला अतिशय सोपे आहे. डावा पाय उजव्या पायापासून साधारण एक ते दीड फूट अंतरावर ठेवावा. मग दोन्ही पायांचे तळवे विरुद्ध बाजूने बाहेर काढून एका सरळरेषेत ठेवावे. या अवस्थेत पायाच्या दोन्ही टाचा एका रेषेत आणि चवडे मात्र विरुद्ध दिशेत हवेत. दोन्ही गुडघ्यामध्ये थोडेसे वाकावे आणि किंचित बसल्यासारखी स्थिती घ्यावी.

दोन्ही हात कमरेपासून किंचित लांब नेऊन पुढे काढून हाताचे पंजे जणूकाही मृदंग वाजवत आहे अशा स्थितीत घ्यावेत. या आसनामध्ये तोल सांभाळणे गरजेचे आहे. प्रथम 15 सेंकदांपर्यंत टिकवता येते पण अधिक सरावाने हे आसन दोन मिनिटांपर्यंत टिकवता येते. या आसनाचे अनेक फायदे आहेत.

गुडघे, पोटऱ्या, मांडी यांच्या स्नायूंना ताण आल्यामुळे यांचे कार्य सुधारते. एकाचवेळी ताण आणि पीळ सांध्यावर येतो त्यामुळे सांधेदुखी कमी होते तसेच मलसंचय कमी होतो. स्नायूंचा रक्‍तपुरवठा वाढतो, या आसनामुळे शरीरातील सर्वच पेशी अधिक कार्यक्षमतेने काम करू लागतात. आसन सोडताना प्रथम हात खाली घ्यावेत मग गुडघ्यात सरळ व्हावे, मग चवडे समोरच्या दिशेने नेऊन डावा पाय उजव्या पायाच्या जवळ आणावा व दंड स्थिती घ्यावी.

या आसनात दोन्ही चवडे बाहेरच्या दिशेने वळवल्यामुळे कमरेच्या स्नायूंना पीळ पडतो. हात पुढे घेतल्यामुळे तोल सांभाळणे सोपे जाते, पण तरीही दोन्ही गुडघ्यात वाकल्यामुळे चवडा आणि टाच दोन्ही एका सरळ रेषेत असल्यामुळे शरीराचा तोल सांभाळणे थोडे कठीण जाते. डावा चवडा डावीकडे आणि उजवा चवडा उजवीकडे आणि त्यात दोन्ही टाचांमध्ये दहा ते पंधरा इंच अंतर ठेवावे.

आपल्या कमरेपुढे जणुकाही मुदंग बांधला आहे आणि तो आपण हाताने वाजवतो आहे अशी मृंदगासनाची कल्पना आहे. प्राचीन ग्रंथामध्ये या आसनाचे वर्णन आढळत नाही पण अर्वाचिन ग्रंथात सापडते. ज्यांचे गुडघ्याचे सांधे दुखावलेले आहेत किंवा कडक झालेले आहेत त्यांनी योग तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे म्हणजे गुडघ्यातून वेदना होणार नाही. करायला सोपे तसेच टिकवायलाही सोपे असे हे आसन दिवसातून एकदा करावेच.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar