Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !

by प्रभात वृत्तसेवा
June 20, 2022
in लाईफस्टाईल
A A
व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई : व्हॉट्सऍपने आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्रायव्हसी फिचर आणण्यास सुरुवात केली आहे. या नवीन फीचरच्या मदतीने वापरकर्ते निवडक लोकांपासून त्यांचे प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन लपवू शकतील. हे फिचर गेल्या वर्षी चाचणी दरम्यान दिसून आले होते आणि आता ते सर्वांसाठी प्रसिद्ध केले जात आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सऍपने अलीकडेच अँड्रॉइडवरून आयफोनवर चॅट्स ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली आहे.

व्हॉट्सऍपने ट्विट करून नवीन फीचरची माहिती दिली आहे. यापूर्वी अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांना लास्ट सीन आणि प्रोफाइल फोटोच्या प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये एव्हरीवन, माय कॉन्टॅक्ट्स आणि नोबडी हा पर्याय दिसत होता आणि आता माय कॉन्टॅक्ट्स एक्ससेप्ट (My Contacts Except) हा चौथा पर्याय म्हणून जोडण्यात आला आहे. या पर्यायावर क्लिक करून, वापरकर्ते विशिष्ट संपर्क निवडू शकतात ज्यांना प्रोफाइल फोटो दिसणार नाही आणि लास्ट सीनही दिसणार नाही.

याआधी जर एखाद्याचा संपर्क क्रमांक फोनमध्ये सेव्ह असेल तर तो तुमचा प्रोफाईल फोटो पाहू शकत होता. अशा परिस्थितीत प्रोफाईल फोटो लपवण्यासाठी नंबर डिलीट किंवा ब्लॉक करावा लागत होता. पण आता असे होणार नाही.

या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सऍपने अँड्रॉइडवरून आयओएसवर चॅट ट्रान्सफरसाठी सपोर्ट जारी केले आहे. हे फिचर सध्या बीटा चाचणीमध्ये आहे आणि ते लवकरच प्रत्येकासाठी जारी केले जाईल. अँड्रॉइड फोनवरून आयफोनवर व्हॉट्सऍप चॅट्स सह सर्व डेटाचा बॅकअप घेण्यासाठी, एखाद्याला अँड्रॉइड फोनमध्ये Move to iOS हे ऍप डाउनलोड करावे लागेल.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar