Sunday, March 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

व्हॉट्सऍप गोपनीयतेचे दोष लपवतोय? रेडिओ-टीव्ही आणि वर्तमानपत्रातील जाहिरातींचा अर्थ नेमका काय?

by प्रभात वृत्तसेवा
September 22, 2021
in लाईफस्टाईल
A A
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले ‘हे’ भन्नाट फिचर; एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ-फोटो होणार डिलीट
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

व्हॉट्सऍपने एक नवीन धोरण लागू केले आहे.  त्यानुसार ते  व्हॉट्सऍपच्या बिझनेस अकाऊंटवरील चॅट्स वाचेल आणि त्यानुसार वापरकर्त्याला जाहिराती दाखवेल.  व्हॉट्सऍप हा डेटा फेसबुकसोबतही शेअर करेल.  व्हॉट्सऍपचे हे नवे धोरण आल्यानंतर जगभरात अनेक वाद निर्माण झाले. लाखो लोकांनी त्यांच्या फोनवरून व्हॉट्सऍप अनइन्स्टॉल केले आणि सिग्नल, टेलिग्राम सारख्या ऍप्सला आपल्या फोनमध्ये जागा दिली. 

गोपनीयतेच्या वादापासून व्हॉट्सऍप जाहिरातींवर खूप पैसा खर्च करत आहे. रेडिओपासून टीव्ही आणि वृत्तपत्र तसेच यूट्यूब सारखे डिजिटल प्लॅटफॉर्म देखील  व्हॉट्सऍपच्या जाहिरातींनी भरलेले आहेत. यू -ट्यूबवर आजी -आजोबांच्या ऍनिव्हर्सरीची जाहिरात तुम्ही पाहिली असेलच. आता ही समस्या जाहिरातीची नाहीच आहे, तर समस्या त्या गोपनीयतेची आहे की ज्यासाठी व्हॉट्सऍप जाहिरातींवर इतके पैसे खर्च करत आहे आणि गोपनीयतेबद्दल प्रचंड मोठे दावे करत आहे.

जाहिरातींवर पैसे खर्च करण्याची मुख्य कारणे

याची दोन कारणे असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे नवीन गोपनीयता धोरणाच्या वादानंतर व्हॉट्सऍपला खूप त्रास सहन करावा लागला आहे, ज्यांची माहिती ते सार्वजनिक करत नाहीत, परंतु वापरकर्त्यांना परत आपल्याकडे ओढून घेण्यासाठी विविध प्रकारचे गोपनीयता-आधारित जाहिराती देत आहेत. दुसरे कारण असे असू शकते की जाहिरातीद्वारे कंपनी ‘प्रायव्हसी फिचर’ चे दोष लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या 5-6 महिन्यांपासून, भारतातील व्हॉट्सऍपच्या इतिहासात पहिल्यांदाच भरपूर जाहिरातींचा भडीमार पाहायला मिळत आहे.

व्हॉट्सऍप संदेश खरोखर एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत का?

व्हॉट्सऍप नेहमीच दावा करत आले आहे की त्याचे ऍप पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहे, परंतु असे देखील म्हटले आहे की जर आपण गूगल ड्राईव्हसारख्या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवर चॅटचा बॅक अप घेतला तर एन्क्रिप्शन तेथेच संपेल. याचा पुरावा दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या बाबतीत दिसला जेव्हा त्याचे 2017चे व्हॉट्सऍप चॅट्सना पोलिसांनी मिळवले होते. मात्र आता कंपनीच्या दाव्यानुसार चॅटचा थर्ड पार्टी बॅकअप एंड-टू-एंड एन्क्रिप्ट केलेला आहे .

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन म्हणजे तुम्ही ज्यांना मेसेज पाठवता, तुम्ही आणि फक्त ज्याच्याकडे मेसेज पाठवला जातो त्याच्याकडे त्या मेसेजची माहिती असते. व्हॉट्सऍप देखील तुमचा मेसेज वाचत नाही. मात्र, हे पूर्णपणे सत्य नाही, कारण तुमच्या मेसेजच्या विरोधात कोणतीही तक्रार आल्यास कंपनी डिक्रिप्ट करून तुमचा मेसेज वाचू शकते.

व्हॉट्सऍप तुमचे संदेश वाचत नाही, मग 1000 कंटेंट रिव्ह्यूअर का ठेवले गेले ?

व्हॉट्सऍपच्या दाव्यानुसार ते तुमचे मेसेज वाचत नाहीत, परंतु अलीकडेच इन्व्हेस्टिगेटिव्ह वेबसाईट ‘प्रोपब्लिका’ने आपल्या एका अहवालात दावा केला आहे की  व्हॉट्सऍपने सुमारे 1000 कंटेंट रिव्ह्यूअर नियुक्त केले आहेत जे व्हॉट्सऍपवर पाठवले जाणारे कंटेंट (फोटो, व्हिडिओ) वाचू शकतील. इ. या समीक्षकांना विशेष सॉफ्टवेअर पुरवले जाते आणि ऑस्टिन, टेक्सास, डब्लिन आणि सिंगापूर येथील कार्यालयांमधून काम केले जाते. या लोकांना एका तासासाठी सुमारे 1,200 रुपये मिळतात.

व्हॉट्सऍपच्या मते, ही टीम फक्त फसवणूक, चाईल्ड पोर्नोग्राफी, द्वेषयुक्त भाषण, दहशतवादी षड्यंत्र या प्रकारांमध्ये नोंदवलेली सामग्री अथवा कन्टेन्ट वाचते. येथे सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा जेव्हा अकाउंट किंवा कन्टेन्टची तक्रार केली जाते, तेव्हा समीक्षक तुमचे शेवटचे पाच संदेश देखील पाहतात.

अशा परिस्थितीत, साधी गोष्ट अशी आहे की रिपोर्ट केलेल्या मेसेज व्यतिरिक्त व्हॉट्सऍप तुमचा अन्य कन्टेन्ट आणि संदेश पाहत आहे, म्हणजे तुमचे व्हॉट्सऍप पूर्णपणे खाजगी नाही आणि कंपनीचा एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचा दावा, त्याशी संबंधित जाहिराती फक्त एक प्रसिद्धी स्टंट आहेत !

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar