Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

व्हॉट्सऍपच्या कॅमेऱ्यात होणार मोठे बदल, अन्य नवे फिचर्सही लवकरच येणार!

by प्रभात वृत्तसेवा
August 27, 2022
in लाईफस्टाईल
A A
व्हॉट्सऍपच्या कॅमेऱ्यात होणार मोठे बदल, अन्य नवे फिचर्सही लवकरच येणार!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

लोक अनेकदा व्हॉट्सऍपवर सर्व प्रकारचा मजकूर पाठवतात. अनेक वेळा आपण थेट कॅमेऱ्यातूनही सेल्फी फोटो किंवा व्हिडिओ एखाद्यासोबत शेअर करतो. साधारणपणे कॅमेराचा शॉर्टकट बार आपल्याला तळाशी मिळतो पण आता कंपनी त्यात मोठा बदल करण्याची तयारी करत आहे. व्हॉट्सऍप लवकरच मुख्य ऍपच्या इंटरफेसमध्ये कॅमेरा शॉर्टकट सादर करण्याच्या तयारीत आहे.

व्हॉट्सऍपच्या (WhatsApp) नवीन अपडेटनंतर अँड्रॉईड फोनमधील कॅमेऱ्याचा शॉर्टकट सर्वात वरच्या सर्च बारसह मिळेल. ते अँड्रॉइडच्या बीटा आवृत्तीवर आहे. सद्या याची चाचणी सुरू आहे, त्यामुळे त्याचे अंतिम अपडेट कधी प्रसिद्ध होईल हे सांगणे कठीण आहे. व्हॉट्सऍप एका कम्युनिटी फीचरवरही काम करत आहे. याशिवाय, व्हॉट्सऍप आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे आल्यानंतर चॅट लिस्टमधूनच एखाद्याचे स्टेटस पाहता येईल.

WABetaInfo ने व्हॉट्सऍपच्या या नवीन फीचरची माहिती दिली आहे. नवीन फिचर Android च्या बीटा आवृत्ती 2.22.19.7 वर देखील वापरले जाऊ शकते. नवीन बीटा आवृत्ती Google Play Store वर अपडेट करण्यात आली आहे, जिथून बीटा वापरकर्ते ते डाउनलोड करू शकतात.

व्हॉट्सऍप सध्या अनेक फीचर्सवर काम करत आहे. एका नवीन अहवालानुसार, व्हॉट्सऍप एका फीचरवर काम करत आहे, ज्यानंतर व्ह्यू वन्स किंवा डिसपिअरिंग मेसेजचे स्क्रीनशॉट घेणे शक्य होणार नाही.

आणखी एक नवीन फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे, त्यानंतर यूजर्सना कॉन्टॅक्टच्या चॅटवर टॅप करून यूजर्सची स्टेटस पाहण्याची सुविधा मिळेल. म्हणजेच, इतर वापरकर्त्यांचे स्टेटस चॅट बॉक्सच्या प्रोफाइलमध्येच चमकेल आणि तुम्ही ते येथून टॅप करून पाहू शकता. व्हॉट्सऍपचे हे फीचर इंस्टाग्रामच्या फीचरप्रमाणे काम करते, ज्यामध्ये चॅट लिस्टमधूनच स्टोरी पाहता येते. (There will be big changes in the WhatsApp camera, other new features will also come soon)

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar