बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची “आर्या-2′ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. या वेबसीरीजमधील प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. “आर्या-2’मध्ये सुष्मिता सेनची मुलगी आरुची भूमिका साकारणारी वीर्ति वाघानी प्रसिद्धीच्या झोतात आहे.
वीर्ति ही सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. तसेच इंस्टाग्रामवर तिचे असंख्य फॉलोअर्सदेखील आहेत. वीर्तिने अवघ्या वयाच्या 18व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रामध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे.
वीर्तिने 2008मध्ये “जय श्रीकृष्ण’ या मालिकेत साकारलेल्या राधाच्या भूमिकेला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. तसेच 2011मध्ये रिलीज झालेल्या पटियाला हाउस या चित्रपटातून तिने डेब्यू केले होते. यात वीर्तिने अक्षय कुमार आणि अनुष्का शर्मा निर्णायक भूमिका साकारली होती.