Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

विवाह टाळण्यासाठी नक्षली अन्‌ लग्नासाठी शरणागती – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 20, 2021
in आरोग्य वार्ता
A A
विवाह टाळण्यासाठी नक्षली अन्‌ लग्नासाठी शरणागती – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

गडचिरोली -काकांनी लहान वयात करून देत असलेला विवाह टाळण्यासाठी अवघ्या 13 वर्षांची असताना नक्षलवादी चळवळीत सहभागी झालेल्या तरुणीने 20 व्या वर्षी पोलिसांपुढे शरणागती स्वीकारली आहे.

सविता नारोटी या अनेक गुन्हे दाखल असलेल्या 20 वर्षांची तरुणी. सविता ऊर्फ करिष्मा ऊर्फ गंगा नारोटी. दिसायला अगदी लहान चणीची ही युवती अनेकांच्या मनात धडकी भरवत असे. सात वर्षांत तिने अनेक नक्षली कारवायांत सहभाग घेतला आहे.

जांभूळखेडा येथे झालेल्या चकमकीत ती नक्षल्यांकडून सहभागी झाली होती. त्यात 15 जवान शहीद झाले होते. त्यानंतर तिच्यावर दोन लाखाचे इनाम जाहीर करण्यात आले होते. तिने एकूण 14 चकमकीत पोलिसांशी दोन हात केले आहेत.

तिच्यावर चार जणांच्या हत्येचे आरोप असून कडवी नक्षलवादी अशी तिची ओळख आहे. सध्या गडचिरोली भागात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्याने तरुण नक्षलवादाकडे फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे चळवळीत जान ठेवण्यासाठी छत्तीसगढमधून काही नक्षलवादी या भागात पाठवले. सविता त्यातून येथे आली. येथे आल्यानंतर एक कंपनीत काम करणाऱ्या तरुणाशी सविताची ओळख झाली. जाता येता झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

पण तिचा भूतकाळ विवाह करण्यात अडथळा ठरत होता. अखेर प्रेमाचा विजय झाला. सविताने शरणागती स्वीकारत आपल्या विवाहाचा आणि सुखकर आयुष्याचा मार्ग खुला केला. गडचिरोलीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या माध्यमातून आत्मसमर्पण केले.

नक्षल चळवळीत कशी अडकली?

आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानतंर सविता काकांकडे राहत होती. अवघ्या 13 व्या वर्षी काकाने तिचे लग्न ठरवले. मात्र सविताला एवढ्यात लग्न करायचे नव्हते. त्यामुळे यातून सुटकेसाठी ती नक्षली चळवळीत सामील झाली. शुभ मंगल सावधान म्हणताच नक्षली बनणारी सविता विवाहासाठीच त्यातून बाहेर पडली. अन्‌ एक वर्तूळ पूर्ण झाले.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar