[[{“value”:”
लंडन : एखादा जगावेगळा विक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण या विक्रम पुस्तकांमध्ये अनेकवेळा विक्रम करून नोंद करून घेण्याचा विक्रम डेव्हिड रश या विक्रमवीराने केला आहे. त्याने नुकताच एक वेगळा विक्रम करून 171 व्यांदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
डोक्याला संपूर्णपणे शेविंग क्रीम लावून भिंतीवर टेबल टेनिसचा बॉल आपटून तो या क्रीममध्ये पकडण्याचा हा अनोखा विक्रम होता. गेल्या आठवड्यात डेव्हिडने हा विक्रम केला आणि भिंतीवर 14 वेळा टेबल टेनिसचा चेंडू आपटून तो डोक्यावरील शेविंग क्रीममध्ये पकडण्याचे काम त्याने केले आहे. अशा प्रकारचा विक्रम अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील डेव्हिड सारचन याच्याही नावावर आहे.
दोघांनीही अर्ध्या मिनिटाच्या कालावधीमध्ये टेबल टेनिसचे 14 चेंडू डोक्यावरील शेविंग क्रीममध्ये पकडण्याचा विक्रम केल्यामुळे हा विक्रम आता त्यांच्या दोघांच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. पण डेव्हिडसाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याचा हा 171 वा विक्रम आहे. अशा प्रकारचे एकूण 181 विक्रम करून जागतिक स्तरावर सर्वोच्च कामगिरी करण्याचा डेव्हिडचा मनोदय आहे. 181चे ध्येय गाठण्यासाठी अजून त्याला दहा विविध प्रकारचे विक्रम करावे लागणार आहेत.
The post विक्रमवीर डेव्हिड रशचा आणखी एक विक्रम; 171 व्यांदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मिळवले स्थान appeared first on Dainik Prabhat.
“}]]
