Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

वाहन क्षेत्रातील मंदी निवळली – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
August 3, 2022
in लाईफस्टाईल
A A
वाहन क्षेत्रातील मंदी निवळली – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

 

मुंबई, दि. 2- करोनामुळे वाहन विक्रीवर परिणाम झाला होता. त्यानंतर सेमीकंडक्‍टर आणि इतर सुट्या भागाच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता हे प्रश्न संपुष्टात येत असून वाहन कंपन्यांच्या विक्रीत वेगाने वाढ होत आहे.

जुलै महिन्यामध्ये वाहन कंपनीच्या विक्रीत भरमसाठ वाढ झाली असल्याची आकडेवारी या कंपन्यांनी जारी केली आहे. मारुती सुझुकी कंपनीची वाहन विक्री सात टक्‍क्‍यांनी वाढवून 1,42,850 इतकी झाली आहे. टाटा मोटर्सची वाहन विक्री 57 टक्‍क्‍यानी वाढून 47,50 5 इतकी झाली आहे. महिंद्रा कंपनीची वाहन विक्री 33 टक्‍क्‍यांनी वाढून 28,053 इतकी झाली आहे. या कंपनीच्या स्कॉर्पिओ कारला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. किया इंडियाची विक्री 47 टक्‍क्‍यानी वाढून 22,022 इतकी झाली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटारची विक्री 50 टक्‍क्‍यांनी वाढून 19,693 इतकी झाली आहे.

स्कोडा कंपनीची विक्री 44 टक्‍क्‍यांनी वाढून 4,447 इतकी झाली आहे. होंडा कारची विक्री 12 टक्‍क्‍यांनी वाढून 6,784 झाली आहे. एमजी मोटारची विक्री पाच टक्‍क्‍यांनी कमी होऊन 4,013 इतकी झाली आहे. ह्युंदाई कंपनीची विक्री सहा टक्‍क्‍यांनी वाढून 63, 851 इतकी झाली आहे.

बहुधांशहकार कंपन्यांच्या विक्रीमध्ये भरपूर वाढ झाली असली तरी बजाज ऑटो या कंपनीच्या दुचाकी वाहन विक्रीत 5% ची घट झाली असून या कंपनीने जुलै महिन्यात 3,15,054 दुचाकीची विक्री केली. कंपनीच्या व्यावसायिक वाहनाची विक्रीत तीन टक्‍क्‍यांनी वाढून 39,616 इतकी झाली आहे.

टीव्हीएस मोटार कंपनीची विक्री 13 टक्‍क्‍यांनी वाढवून 3,14,639 इतकी झाली आहे. महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्‍टरची विक्री 14 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 23, 360 इतकी झाली आहे. तर अशोक लेलॅंड या कंपनीच्या व्यावसायिक वाहनाची विक्री 58 टक्‍क्‍यांनी वाढून 13,625 इतकी झाली आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar