Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

वारंवार तोंड येण्यावर उपाययोजना – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
May 25, 2022
in आरोग्य वार्ता
A A
वारंवार तोंड येण्यावर उपाययोजना – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वारंवार तोंड येण्यावर उपाययोजना :

सर्वांत प्रथम तोंड येण्याची जी कारणे सांगितली आहेत, ती पूर्णपणे टाळावीत. मुखाची स्वच्छता व्यवस्थित व वारंवार करावी. यासाठी आयुर्वेदाने मुखधावन, गंडूष, प्रतिसारण असे उपाय सांगितले आहेत. हिरडा, बेहडा, आवळा, पाठा, मनुका, गुळवेळ, कात, जाईची पाने यांचा काढ्याने वारंवार चूळ भरावी. तसेच पाण्यात मध, हळद, तुरटी मिसळून चूळ भरावी किंवा थोडा वेळ तोंडांमध्ये पाणी तसेच धरावे. जाईची पाने चघळून लाल गाळावी. ह्या सर्वांमुळे फारच लवकर फायदा होतो.

तसेच पोटामधून आवळा, हिरडा, जेष्ठमध, हळद, कात, मंजिष्ठा, चंदन, अनंतमूळ, गुळवेल, नागरमोथा, वेलची, शतावरी, ब्राह्मी, भुईकोहळा, कुटकी, कमळ, मनुका, गंधक, अभ्रकभस्म, मासिकभस्म गोंदनी भस्म, मोतीभस्म ह्यांच्या औषधाचा उपयोग करावा. तसेच तोंडामध्ये लावण्यासाठी काही औषधी तेले असतात. तसेच पोषण सुधारण्यासाठी च्यवनप्राश, औषधी तूप यांचा फारच चांगला उपयोग होतो. शिवाय आहारातील बदल देखील फार महत्त्वाचा आहे.

आजपर्यंत प्रत्येकानेच तोंड येणे हा प्रकार अनुभवला असेल; परंतु जर वारंवार तोंड येत असेल तर मात्र खाण्याचे, बोलण्याचे फारच हाल होतात. एवढेच काय परंतु तब्येतीवरही ह्या किरकोळ वाटणाऱ्या तक्रारीचा फार मोठा परिणाम होतो. खाता न आल्यामुळे तब्येत बारीक होत जाते. अशक्‍तपणा येतो. आळस येतो. लक्ष लागत नाही की वेळच्यावेळी आठवत देखील नाही. पुढे पुढे कुपोषण होऊन एकूणच कार्यक्षमता कमी होते. बुद्धीची धारही कमी होते. कारण बिुद्धमत्तेचा मार्ग पोटातून जातो.

वारंवार तोंड येण्याची कारणे
शरीरामध्ये पित्ताचे प्रमाण जास्त असणे, तोंडाची, दात, जीभ, हिरड्या यांची पुरेशी स्वच्छता नसणे, तंबाखू, दारू, गुटखा यांचे सेवन, वारंवार तळलेले अतिमसालेदार, तिखट अन्न खाणे, ब जीवनसत्त्वाची कमतरता, वारंवार पेस्ट बदलणे, वारंवार ऍन्टिबायोटिक्‍स घ्यावे लागणे, तसेच कॅन्सरविरोधी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा दुष्परिणाम, तोंडांमध्ये ब्रश करताना किंवा इतर काही कारणाने मार लागणे किंवा जखमा होणे. मानसिक ताणतणाव, तसेच काही जंतूमुळे ही तोंड येण्याची काही सामान्य कारणे आहेत. तसेच एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांमध्ये देखील वारंवार तोंड येण्याची प्रवृत्ती असते.

तोंड येते तेव्हा काय होते
तोंड येते तेव्हा जीभ, गालाचा आतील भाग, टाळूचा भाग, ओठांचा आतील भाग, पूर्णपणे लाल होतो. तोंडामध्ये पांढरट, पिवळसर गोल गोल जखमा होतात. कधी कधी तोंडामध्ये आत तसेच घशामध्ये पांढरट थर जमा होतो. जखमा दुखतात. त्यामुळे बोलताना, खाताना त्रास होतो. तोंडातून गरम वाफा निघाल्यासारख्या वाटतात. कधी तोंड गोडसर होते तर कधी लाळ खूप प्रमाणात येते, कधी तोंड कोरडे पडते. जिभेच्या कडेचा आकार बदलतो. जिभेवरील उंचवटे नाहीसे होतात.

तोंडामधील अन्नाचा स्पर्शदेखील वेदनादायी होतो. गार तसेच गरम काहीही लागून देत नाही. ब्रश करताना तर वेदनेने डोळे पाणावतात. जर तोंड वारंवार येत असेल तर मग ताप, कणकणदेखील येते. भूक लागूनदेखील खाता न आल्यामुळे किंवा अन्न बारीक चावून न खाता तसेच मोठे मोठे तुकडे गिळल्यामुळे पचन संस्थेवर ताण येतो. पचन बिघडते. यातून पुढे भूक मंदावते, शरीरात पोषण कमी होते. त्यामुळे तब्येत खालवणे, वजन कमी होणे. अशी लक्षणे दिसतात. कुपोषणामुळे प्रतीकारशक्‍ती कमी होऊन निरनिराळे आजार डोके वर काढतात. एकूण काय संपूर्ण आरोग्य दिनक्रम बिघडून जातो.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar