Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

वात व पित्तनाशक ताडफळाचे जाणून घ्या फायदे – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2022
in आरोग्य वार्ता
A A
वात व पित्तनाशक ताडफळाचे जाणून घ्या फायदे – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

ताडफळाचे झाड (बोरगॅस फ्लॅबीझीफर) खूपच उपयोगी आहे. त्याच्या पातीपासून छत्र्या, पंखे बनवितात. खोड घराचे बहाले व पन्हाळे बनविण्यास उपयोगी आहे. आश्‍चर्य म्हणजे सिंहल द्वीप, कर्नाटक, द्रवीड येथे अजूनही ताडपत्रावर पोथ्या लिहितात.

ताडपत्राची पाने दूध पाण्यात उकळून वाळवतात व लोखंडी खिळ्यांचा उपयोग लेखणीसारखा करून त्यावर मजकूर लिहितात. या ताडपत्रावर मजकूर कागदापेक्षा खूप वर्ष अर्थात्‌ वर्षानुवर्ष टिकतो. याची फळे म्हणजे उन्हाळ्यातले ताडगोळे! खरे तर हे ताडगोळे मूळचे समुद्र किनाऱ्यालगतचे. या ताडफळांचा रंग तपकिरी असतो. ताडफळांत जेलीसारखा किंचित पिठूळ किंचित गोड असा गर असतो.

डाएटिंग करणाऱ्यास उपयुक्‍त
कोवळा गर हा जर रोज उन्हाळ्यातील आहारात समाविष्ट केला तर वजन नियंत्रित होते. ताडफळ हे लो कॅलरी फळ आहे. त्याचा उष्मांक 29 एवढा कमी आह तर शर्करेचे प्रमाण हे 20.7 आहे.

वात व पित्तनाश
ह्या वृक्षापासून ताडी काढतात. जी काढल्यावर लगेच प्यायली असता पित्ताचा नाश करते. ही मादक असते; परंतु ही आंबट झाली असता पित्तकर होते. ताडी वातनाशकही आहे. अशाप्रकारे ताडफळीचे झाड हे औषधी आणि उपयुक्‍त आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar