लंडन – स्वप्न पडणं ही एक नैसर्गिक घटना मानली जाते आपल्याला कोणते स्वप्न पडावे हे कोणाच्याही हातात नसते एका ताज्या अभ्यासानुसार वाईट स्वप्नांचा बुद्धीवर आणि स्मृतीवर परिणाम होऊ शकतो त्या व्यक्तीला एकाच आठवड्यात चार किंवा चार पेक्षा जास्त वेळा जर वाईट स्वप्ने पडली तर त्याला विस्मरणाचा आजार जडण्याचा धोका सर्वात जास्त असतो असे या अभ्यासात म्हटले आहे.
यामध्येही सर्वात जास्त धोका पुरुषांना असून महिलांना कमी धोका आहे 30 ते 64 या वयोगटातील ज्या महिला किंवा पुरुषांना आठवड्यातील चार दिवस अशा प्रकारचे वाईट स्वप्ने पडतात त्या पैकी 59 टक्के पुरुषांना आणि 41 टक्के महिलांना विसमरणाचा आजार जडण्याचा जास्त धोका असतो बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हा अभ्यास केला असून त्याचा अहवाल प्रदर्शित केला आहे 79 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना कमी प्रमाणात वाईट वाईट स्वप्ने पडतात हे प्रमाण फक्त पाच टक्के आहे वाईट स्वप्न पडल्यावर व्यक्ती दिवसभर त्याचा विचार करत राहते आणि एकंदरीत त्याच्या व्यवहारावर या स्वप्नाचा परिणाम होत राहतो साहजिकच एकाच आठवड्यात चार वेळा अशा प्रकारची वाईट स्वप्ने पडली तर त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर निश्चितपणे होतो.
महिलांना तरुण वयात आणि मध्यम वयामध्ये वाईट स्वप्ने पडण्याचे प्रमाण जास्त असते पुरुषांमध्ये मात्र जसजसे त्यांचे वय वाढत जाईल तसतसे त्यांचे वाईट स्वप्न पडण्याचे प्रमाण वाढत जाते पण वयाची ऐंशी गाठेपर्यंत हे प्रमाण पुन्हा एकदा कमी होत राहते डॉ अबीडमी एकाटकू यांनी हे संशोधन केले असून वाईट स्वप्नंबरोबरच कमी प्रमाणात व्यायाम करणे किंवा धुम्रपानासारखी व्यसने करणे यामुळे सुद्धा नंतरच्या कालावधीत विस्मरणाचा आजार जडू शकतो असे त्यांनी म्हटले आहे
error: Content is protected !!