Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

वर्ष समाप्ती साजरी करण्यासाठी शांत व सुंदर ठिकाणे

by
December 22, 2022
in लाईफस्टाईल
A A
वर्ष समाप्ती साजरी करण्यासाठी शांत व सुंदर ठिकाणे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – साल 2022 संपायला आणि नाताळच्या आगमनाला आता काहीच दिवस राहिले आहेत. जगभर नाताळची जोरदार तयारी सुरू आहे. हा सण 25 डिसेंबरला साजरा केला जातो. असे मानले जाते की 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. या दिवशी देशात आणि जगभरात उत्साही वातावरण असते. लोक ख्रिसमस निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी सुट्टीला जातात. जर तुम्ही देखील सुट्टीला पर्यटनासाठी जाण्याचा विचार करत असाल आणि शांत व आनंदात वर्ष समाप्ती आणि नाताळ साजरा करण्याचा विचार करत असाल तर पुढील तीन ठिकाणांचा तुम्ही नक्की विचार करू शकता.

1) नाको – ख्रिसमस साजरा करण्यासाठी नाको हे उत्तम ठिकाण आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे गाव हिमाचल प्रदेशातील किन्नर जिल्ह्यात आहे. या गावाच्या जवळच नाको तलाव आहे. पर्यटक सुट्टीसाठी येथे येऊन राहतात. मात्र फारच कमी जणांना इथल्या निसर्ग सौंदर्याची माहिती असल्याने अत्यंत कमी संख्येने पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळे इथे फारशी गर्दी नसते. नाकोपासून जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे सिमला आणि जवळचा विमानतळ हा कुलु मनाली येथे आहे. कुलु मनाली पासून नाको गाव 245 किलोमीटरवर आहे.

2) धनुषकोडी – तुम्हाला शांत आणि निवांतपणे सुट्टी घालवायची असेल तर तुम्ही धनुषकोडीला जाऊ शकता. पर्यटनासाठी हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. निसर्ग सौंदर्यासाठी धनुषकोडी ओळखले जाते. अर्थात सुनामीमुळे इथले गाव उठले असले तरी येथील सौंदर्य पाहण्यासारखे आहे. येथून श्रीलंका जेमतेम 18 मैल अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यापूर्वी गाईड कडून धनुषकोडी ची पूर्ण माहिती घ्यावी.

इडुक्की जर तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी नाताळ साजरा करायचा असेल तर त्यासाठी इडुक्की हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. इडुक्कीला देवाचे घर असे म्हटले जाते. विस्तीर्ण चहाच्या बागा, वन्यजीव अभयारण्य यांनी हा परिसर अतिशय नटलेला आहे. या ठिकाणी मंगला देवीचे प्राचीन मंदिर आहे.

The post वर्ष समाप्ती साजरी करण्यासाठी शांत व सुंदर ठिकाणे appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar