दोन्ही पाय गुडघ्यांत न वाकवता सरळ ठेवावेत. नंतर डावा पाय गुडघ्यात वाकवून कमरेजवळ आणावा. उजवा पाय गुडघ्यात वाकवून कमरेजवळ आणावा व चवड्यावर बसावे. दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवावे व चवडे मागच्या दिशेने पसरावे व पायाचे अंगठे एकमेकांना जुळलेले ठेवावेत. या तऱ्हेने झालेल्या पायाच्या खळग्यात बैठक टेकून सरळ बसावे. दोन्ही हात गुडघ्यांवर पालथे ठेवावेत.
आसन पूर्ण होताच डोळे अलगद मिटावेत. ज्या ठिकाणच्या स्नायूंवर अधिक ताण येतो असे वाटत असेल ते ते स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करावा आणि स्थिरता व सुखकारकतेचा अनुभव घ्यावा. संथ श्वसन चालू ठेवावे.
15 ते 20 आवर्तने होईपर्यंत आसनस्थिती ठेवण्याचा प्रयत्न करावा. आसन सोडताना गुडघे व टाचा उचलून चवड्यावर बसावे. दोन्ही हातांचे पंजे पावलांच्या बाजूला जमिनीवर टेकवून त्यावर शरीराचा तोल सांभाळून प्रथम डावा व मग उजवा पाय सरळ करून बैठकस्थितीत यावे. हे आसन गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत करावे. या आसनाचे फायदे अनेक आहेत.
बऱ्याच गरोदर स्त्रियांच्या पायांवर सूज येते पण या आसनामुळे कमरेपासून शरीराच्या खालच्या भागातील रक्ताभिसरणाची क्रिया चांगल्या तऱ्हेने होते. त्यामुळे पायांची सूज कमी होण्यास मदत होते. पद्मासना- प्रमाणे ध्यानासाठी हे आसन उत्तम आहे. त्यामुळे गरोदर स्त्रिने या आसनात बसून आपल्या बाळाचे मंगल चिंतन व नॉर्मल डिलिव्हरीबद्दल सकारात्मक विचार करीत रोज थोडावेळ बसावे याचा फायदा त्या गरोदर स्त्रीला नक्कीच होतो.
The post वज्रासनाचे आश्चर्यचकीत करणारे फायदे appeared first on Dainik Prabhat.