Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

वजन वाढले की दमाही वाढतोच… – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
March 9, 2022
in आरोग्य वार्ता
A A
वजन वाढले की दमाही वाढतोच… – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

दमा हा एक दीर्घकालीन आजार असून, यात अनेकदा धाप लागते किंवा छातीत घरघरते. याचे गांभीर्य आणि वारंवारता व्यक्तीनुसार बदलते. हा आजार असलेल्या व्यक्‍तीमध्ये ही लक्षणे दर दिवशी किंवा आठवड्यातून अनेकदा दिसू शकतात आणि काही व्यक्‍तींना शारीरिक श्रम केल्यावर वा रात्री ही लक्षणे दिसून येतात.

दम्याचे निदान झाले नाही आणि वेळेवर उपचार झाले नाहीत, तर त्या व्यक्‍तीवर आणि कुटुंबावर प्रचंड ताण येतो. त्याचप्रमाणे त्या व्यक्‍तीच्या दैनंदिन क्रियांवर मर्यादा येतात. त्यामुळे धाप लागणे, छाती आखडणे किंवा छातीमधील वेदना, खोकला किंवा घरघर, उच्छ्वास सोडताना छातीमध्ये घरघर होणे वा शिट्टीसारखा आवाज होणे आणि सर्दी किंवा फ्लूसारख्या श्‍वासांच्या विषाणूमुळे येणारा खोकला वा उबळ या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. या लक्षणांकडे वेळेवर लक्ष द्या आणि वेळेवर उपचार करा. त्याचप्रमाणे स्थूलपणामुळे दमा होण्याची शक्‍यता असते हे तुम्हाला माहीत आहे का? दमा आणि स्थूलपणा यांचा परस्परसंबंध आहे.

वाढते वजन ठरतेय घातक
दमा हा एक दीर्घकालीन आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दोन अब्जांहून अधिक प्रौढ व्यक्‍तींचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते. यापैकी 65 कोटी व्यक्‍ती स्थूल होत्या. 5 ते 19 वयोगटातील 3.50 कोटी मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते किंवा ती मुले स्थूल गटात मोडत होती. ही निश्‍चितच चिंता वाढवणारी आकडेवारी आहे.

स्थूलपणामुळेही दमा वाढतो
त्याचप्रमाणे स्थूलपणामुळे रक्‍तदाब वाढतो आणि धाप लागते तसेच परिणामी दम्याची लागण होऊ शकते. दमा होण्यासाठी स्थूलपणा हे महत्त्वाचे कारण आहे, असे दिसून आले आहे.

सडपातळ बांधा असलेल्या प्रौढांच्या तुलनेने स्थूल व्यक्‍तींमध्ये दम्याचे प्रमाण अधिक असते आणि स्थूलपणामुळे मुले व प्रौढांना दमा होण्याची शक्‍यता अनुक्रमे दोन ते अडीच पटीने वाढते. लहानपणी होणाऱ्या दम्यासाठी स्थूलपणा हे महत्त्वाचे कारण असते आणि त्यामुळे औषधांना प्रतिसाद कमी मिळतो.

स्थूलपणा आणि दमा असेल, तर दम्याची तीव्रता वाढलेली असते, दमा नियंत्रणात आणणे कठीण जाते आणि दम्याचा आजार बळावण्याची शक्‍यता वाढते. सामान्य वजन असलेल्या मुलांच्या तुलनेने प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या किंवा स्थूल मुलांना दमा होण्याची शक्‍यता अधिक असते.

अतिरिक्‍त वजनामुळे छाती व पोटाच्या भागातील वाढलेल्या वजनामुळे फुफ्फुसे आवळली जातात आणि श्‍वास घेणे कठीण जाते. चरबीयुक्‍त उतीमुळे सूज निर्माण करणारे घटक तयार होतात आणि त्यांचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. याची परिणती दम्यामध्ये होते.
स्थूल व्यक्‍ती अधिक औषधे घेतात, त्यांच्यातील लक्षणे अधिक तीव्र असतात आणि वजन प्रमाणात असलेल्या व्यक्‍तींच्या तुलनेत आपल्या दम्यावर नियंत्रण मिळविण्यास कमी सक्षम असतात. दमा आणि जास्त बीएमआय असलेल्या व्यक्‍ती कमी बीएमआय असलेल्या व्यक्‍तींसारखा औषधांना प्रतिसाद देत नाहीत.

अतिरिक्‍त वजन कमी करण्यासाठी काय करावे?
अतिरिक्‍त वजनामुळे दमा होण्याची शक्‍यता वाढते, असलेला आजार बळावतो आणि दम्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जाते. यासाठी आहारात ताजी फळे व भाज्यांचा समावेश करावा आणि चरबीयुक्‍त पदार्थाचे सेवन कमी करावे. तुम्ही कोणता आहार घ्यावा. त्याचप्रमाणे चरबीयुक्‍त घटक अधिक असलेला आहार घेतल्यामुळे दमा असलेल्या व्यक्‍तींच्या श्‍वसनमार्गाला सूज येते. चरबी कमी करण्यासाठी चालणे, धावणे, पोहणे यासारखे व्यायाम करावेत. स्वत:हून औषधे घेऊ नये.

====================

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar