Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

वजन वाढतंय म्हणून नाश्ता बंद करू नका…

by प्रभात वृत्तसेवा
May 27, 2021
in आरोग्य वार्ता
A A
वजन वाढतंय म्हणून नाश्ता बंद करू नका…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण व्यायाम करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत. यामुळे अनेकांचे वजन वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जात आहेत. मात्र, म्हणावे तसे वजन कमी होत नाही. मग अनेकजण वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे बंद करतात. अनेकांना असे वाटते की, सकाळचा नाश्ता नाही केला तर आपले वजन नियंत्रणात राहिलं. मात्र, सकाळचा नाश्ता आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक महत्वाचा असतो.

कित्येकदा वजन वाढतेयं म्हणून सकाळचा नाश्ता करणे अनेकजण टाळतात. पण त्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. हल्ली उपाशी राहण्याची क्रेझ आली आहे. मात्र यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतात. जर आपण सकाळचा नाश्ता योग्य वेळी केला नाही, तर आपली स्मरणशक्तीही कमी होऊ लागते.

झोपेनंतर मेंदूत ग्लुकोजचं प्रमाण कमी होते. सकाळचा नाश्ता हा आपल्या मेंदूला पर्यायी ग्लुकोज पुरवत असतो. जेणेकरून आपण आपल्या दिवसाची सुरूवात एका जोशात आणि नव्या उर्जेने करु शकतो. जे लोक नियमितपणे नाश्ता करतात त्यांच्या शरीरात प्रमाणबद्ध वजन, साखरेचं योग्य प्रमाण, उत्तम मन:स्वास्थ्य, एकाग्रता असते.

सकाळच्या नाश्त्यात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, कबरेदके इत्यादी घटकांचा समावेश असावा. आपल्या आहारात तंतू असणं हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर आजारांना लांब ठेवण्यासाठीही गरजेचं आहे. अंडी, मासे, दूध इत्यादी पदार्थात प्रथिनं असतात. उकडलेलं अंड किंवा अंडयातील चरबी नसलेले पदार्थ तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता.

धान्यातून आणि संपूर्ण धान्याच्या ब्रेडमधूनही संमिश्र कार्बोदके मिळतात. त्यातून शरीराला आवश्यक पोषण मिळते. आपल्या शरीरासाठी पाणी फार गरजेचे आहेत. पाणी योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने, योग्य वेळी पिण्याचे फार महत्त्व आहेत. त्यामुळे दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar