लठ्ठपणामुळे तुमचे सौंदर्य तर कमी होतेच पण त्याचबरोबर इतर आजारांना बळी पडण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सुका मेवा अर्थात ड्रायफ्रुट्स केवळ चवीलाच अप्रतिम नसून त्यांचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. अनेक ड्रायफ्रुट्सच्या मदतीने तुम्ही तुमचे वजनही झपाट्याने कमी करू शकता. सुका मेवा हे सुपरफूड मानले जाते, ते भरपूर प्रमाणात पोषक असतात जे अनेक रोगांशी लढतात आणि शरीराला पोषण देतात. जे लोक रोज ड्रायफ्रुट्स खातात त्यांचे वजन वाढत नाही आणि ते लठ्ठपणाचे शिकार होत नाहीत. चला तर, अशाच काही ड्रायफ्रुट्सबद्दल जाणून घ्या, जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
* अक्रोड :
अक्रोड वजन कमी करण्यास देखील मदत करते. अक्रोडमध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. भूक लागल्यावर अक्रोड खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते. अक्रोडमध्ये असे पोषक घटक असतात, जे मेंदूतील सेरोटोनिनचे रासायनिक स्तर वाढवतात. त्यामुळे भुकेची भावना कमी होते. दररोज मूठभर भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.
बदाम :
वजन कमी करण्यात बदाम सर्वाधिक मदत करतात. वारंवार खाण्याची लालसा दूर करण्यासाठी बदाम खाण्याची शिफारस केली जाते. खरं तर, मूठभर बदाम खाल्ल्यानेही तुमची भूक भागते. यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि भरपूर पोषक असतात ज्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. हे पोटाची चरबी आणि एकूण बॉडी मास इंडेक्स कमी करण्यात मदत करतात. बदामामध्ये मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. मूठभर बदाम खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते.
पिस्ता :
वजन कमी करण्यासाठी पिस्ता खूप फायदेशीर आहे. हे हेल्दी स्नॅक्समध्ये गणले जाते. वास्तविक, पिस्त्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरलेले वाटते. याशिवाय फायबर हे पचनासाठीही चांगले मानले जाते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पिस्त्याचा समावेश करू शकता.
काजू :
काजूमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये असलेले कॅल्शियम शरीरातील चयापचय सुरळीत करण्यासाठी प्रभावी आहे. वजन कमी करण्यासोबतच शरीराला इतर आजारांपासूनही दूर ठेवते. त्यामळे तुम्ही काजूना तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.
मनुका :
वजन कमी करण्यासाठी मनुका हा उत्तम नाश्ता आहे. वाळलेल्या द्राक्षांमध्ये एक मजबूत रसायन असते ज्यामुळे तुमची खाण्याची इच्छा कमी होते.