Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

वक्रासन प्रकार पहिला

by प्रभात वृत्तसेवा
June 5, 2022
in आरोग्य वार्ता
A A
वक्रासन प्रकार पहिला
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वक्रासन प्रकार पहिला

June 5th, 7:00amJune 4th, 2:55pm

प्रभात वृत्तसेवा

आरोग्य जागर

प्रथम दोन्ही पाय गुडघ्यांत न वाकवता एकमेकांना जुळवून घ्यावेत. डावा पाय गुडघ्यात वाकवून त्याची टाच डाव्या मांडीजवळ ठेवावी. चवडा, टाच पूर्णपणे जमिनीवर टेकेल अशा बेताने ठेवावी. डाव्या पायाची मांडी व गुडघा छातीजवळ टेकवून ठेवावा.

कंबरेला थोडासा म्हणजे गरोदर असल्यामुळे झेपेल एवढाच पीळ देऊन डावा हात उजव्या मांडीच्या जवळ अशा रीतीने ठेवावा की, दोन्ही हात एकमेकांसमोर येतील व दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकलेले असतील. खांद्याच्या आधाराने पाठीच्या कण्याला उजव्या बाजूने पीळ देऊन उजव्या खांद्यावरून जास्तीत जास्त उजव्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी मानही उजव्या बाजूला वळवावी. आता आसन पूर्ण झाल्यावर डोळे अलगद मिटावेत.

मिटलेल्या डोळ्यानेच आसनातील स्थिरता व सुखकारकता अनुभवावी. मग संथ श्‍वसन करावे. 5 ते 10 आवर्तने होईपर्यंत, आपल्या क्षमतेनुसार आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. नंतर नेहमीच्या पद्धतीने उलट क्रमाने संथपणे आसन सोडावे. हे आसन करताना अकारण ताण घेऊ नये. त्रास वाटत असेल तर जेवढे जमेल तेवढेच हे आसन करावे. अशाच तऱ्हेने दुसऱ्याही बाजूने आसन करता येते. सर्वसाधारणपणे चौथ्या महिन्यापर्यंत गर्भवती स्त्रिया हे आसन करू शकतात. नंतर पोटाचा आकार वाढल्याने पाचव्या, सहाव्या महिन्यापासून हे आसन जमणे कठीण जाते. अशा वेळी मात्र हे आसन करू नये. या आसनाचे फायदे अनेक आहेत.

यात पाठीचा कणा सरळ ठेवल्यामुळे धुणे पिळल्याप्रमाणे पिळला जातो. त्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. त्याची कार्यक्षमता वाढते. गरोदरपणात जर पाठदुखीचा त्रास होत असेल तर तो हे आसन केल्यामुळे कमी होतो. या आसनात केवळ पाठीचा कणाच पिळला जातो असे नसून पोटाच्या स्नायूंनाही चांगला पीळ बसतो, त्यामुळे पोटातील इंद्रियांची देखील कार्यक्षमता वाढते.

Digital Prabhat
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar