तुम्ही 420 हा आकडा अनेक वेळा सामान्य बोलण्यात ऐकला असेल. जेव्हा कोणी फसवणूक किंवा लबाडी करतो, तेव्हा लोक त्याला 420 म्हणतात. ‘तू मोठा 420 माणूस आहेस’, ‘वो तो 420 निकला’ अशी वाक्य तुम्ही अनेकदा ऐकली असतील. पण त्यामागील कारण फार कमी लोकांना माहीत आहे.
आपण कधी विचार केला आहे का की आपण फक्त 420 हाच नंबर फसवणूक किंवा लबाडीसाठी का वापरतो? त्याऐवजी आपण 421 किंवा 520 का म्हणत नाही? तुम्हालाही याबाबत माहिती नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. आज आम्ही 420 क्रमांकाच्या मागे असणारा अर्थ सांगणार आहोत.
वास्तविक, भारतीय दंड संहितेच्या कलम 420 मुळे, फसवणूक करणाऱ्या, अप्रामाणिक लोकांना 420 म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती फसवणूक, अप्रामाणिकपणा, लबाडी यासारखे कृत्य करते तेव्हा पोलिसांकडून त्याच्यावर कलम 420 लागू केले जाते. हेच कारण आहे की लोक हा नंबर फक्त सामान्य भाषेत वापरतात.
कलम 420 काय आहे ?
कायदेशीररित्या, जेव्हा एखादी व्यक्ती फसवणूक करते, अप्रामाणिकपणे हेरगिरी करते किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या मौल्यवान वस्तू किंवा मालमत्तेची नासधूस करते, तेव्हा त्याच्याविरुद्ध कलम 420 लागू केले जाऊ शकते. एवढेच नाही तर त्याने या कामात कोणाची मदत केली तर त्याला गुन्हेगार ठरवले जाते.
याशिवाय जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याची खोटी कागदपत्रे बनवते, त्याच्या सह्या करून त्याची मालमत्ता त्याच्या नावावर करून घेते, आर्थिक आणि मानसिक दबाव आणते, तेव्हा त्याच्यावरही कलम 420 लागू होऊ शकते.
त्याचबरोबर या प्रकरणांची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालते. गुन्हेगाराला कमाल सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच दंड आकारला जाऊ शकतो.
हा गुन्हा अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा या श्रेणीत येतो. म्हणजे या प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यातून जामीन मिळत नाही. अशा प्रकरणांमध्ये न्यायाधीश स्वत: कोर्टात निर्णय घेतात.