Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Mi लवकरच बंद होण्याची चिन्हे

by प्रभात वृत्तसेवा
August 25, 2021
in लाईफस्टाईल
A A
सॅमसंग, आयफोनला मागे टाकून ‘हा’ ब्रँड बनला जगातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

शाओमी आपले एमआय अर्थात Mi ब्रँडिंग बंद करणार आहे. आता Xiaomi ची उत्पादने ‘Xiaomi’ याच नावाने विकली जातील. मात्र कंपनीने अद्याप या निर्णयाबाबत कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. नवीन ब्रँडिंग कंपनीच्या आगामी स्मार्टफोन मिक्स 4 (Mix 4) सह सुरू होऊ शकते. नवीन फोनचे नाव शाओमी मिक्स 4 असेल. हा बदल फक्त स्मार्टफोनसाठी आहे की Mi बँड आणि स्पीकरसारख्या इतर Mi उत्पादनांसाठी आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उल्लेखनीय आहे की, Mi ब्रँडिंग 10 वर्षांपूर्वी सुरू झाले.

नुकत्याच लॉन्च झालेल्या मिक्स 4 च्या रूपात हा नवीन बदल दिसून आला आहे. पूर्वी त्याचे नाव Mi Mix 4 होते. या मालिकेतील इतर फोन Mi Mix 3 आणि Mi Mix 2 म्हणून लॉन्च करण्यात आले आहेत. XDA डेव्हलपर्सच्या मते, कंपनीच्या कोणत्याही आगामी उत्पादनांशी Mi ब्रँडिंग होणार नाही. विशेष म्हणजे कंपनीच्या आगामी टॅबला Mi Pad 5 आणि Mi Pad 5 Pro असे नाव दिले जात आहे.

Mi ब्रँड अंतर्गत, कंपनीने ऑगस्ट 2011 मध्ये Xiaomi Mi 1 लाँच केले आणि त्यानंतर Mi ब्रँडिंग अंतर्गत स्मार्ट टीव्ही, टॅब्लेट, स्मार्ट डिव्हाइस, खेळणी आणि अनेक ऑडिओ उत्पादने लाँच केली. 26 ऑगस्ट रोजी, शाओमी भारतात स्मार्टर लिव्हिंग 2020 कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यामध्ये Mi TV 5X, Mi Band 6 आणि Mi Notebook सारखी उत्पादने लाँच केली जाणार आहेत.

अलीकडेच रिसर्च फर्म काउंटरपॉईंटने एक रिपोर्ट दिला होता, ज्यात म्हटले होते की जून 2021 मध्ये शाओमी जगातील नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. त्याची विक्री मेच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढली आहे आणि ग्लोबल स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपनीचा वाटा वाढून 17.1 टक्के झाला आहे. 

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar