आजकाल दाढीची फॅशन आहे. बिअर्ड फॅशनचे वेगवेगळे प्रकार जाणून घेऊया…
फुल बिअर्ड : हा सर्वात लोकप्रिय प्रकार. कारण यात फक्त दाढी वाढवायची असते. काही दिवसांनी दाढीला शेप द्यावा लागतो. चेहऱ्यावर भरपूर केस असणाऱ्या व्यक्तींना हा बिअर्ड प्रकार शोभून दिसतो.
स्टबल : हा प्रकार सर्वांना शोभतो. पातळ केस असल्यास हा प्रकार एक वेगळा लूक देतो.
वॅन डायक : अँथनी वॅन डायक या चित्रकाराचा हा लूक आहे. हा लूक मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. यात मिशा आणि दाढीचा भाग वेगवेगळा केलेला असतो.
बॅनडोल्ज : एरिक बॅनडोल्ज या तरुणाची ही स्टाइल आहे. यात गळ्यापर्यंत दाढी असते.
इम्पिरीयल : दाढीपेक्षा मिशी आवडणाऱ्यांसाठी हा प्रकार आहे. तुळतुळीत दाढीवर भरगच्च मिशा असा हा प्रकार आहे.
चीन स्ट्रिप : वर बारीक मिशी, खालच्या ओठाखाली केस ठेवून ते हुनवटीपर्यंत ठेवणे ही चीन स्ट्रिप स्टाइल आहे.
दाढी वाढवताना दाढीला वरील कुठलाही लूक द्या. यामुळे तुम्ही रुबाबदार दिसाल. दाढीला साजेसे कपडे आणि शूज परिधान केले तर तुमचे व्यक्तिमत्त्व चारचौघातही उठून दिसेल.