Sunday, January 25, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

लहान मुलांमध्ये गालगुंड/गालफुगीच्या आजारात वाढ

by
December 18, 2023
in आरोग्य वार्ता
A A
लहान मुलांमध्ये गालगुंड/गालफुगीच्या आजारात वाढ
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – गालगुंड/गालफुगी हा पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या लाळग्रंथींवर (पॅराटीड ग्लॅण्ड) परिणाम करतो. त्यामुळे कानाच्या खालचा जबडा व गाल फुगलेले दिसतात. सध्या लहान मुलांमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते आहे. लसीकरण न झाल्यामुळे हा आजार होत असून, लक्षणे दिसतात डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे. तसेच हा त्रास मुलांना होऊ नये म्हणून एमएमआर (MMR) लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डाॅक्टरांकडून करण्यात आले.

बालरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा बाविस्कर म्हणाल्या, सध्या विषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि डोळ्यांच्या बुब्बुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. अलीकडे गालगुंड देखील याचाच एक भाग बनला आहे. बाह्यरूग्ण विभागात दररोज एक ते दोन मुले उपचारासाठी येत आहे. कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. सुश्रुत देशमुख म्हणाले, गोवर, गालगुंड आणि रुबेला (एमएमआर) लसीकरणाचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे आणि कोविडनंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे गालगुंडाचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम श्रवणशक्ती कमी होण्यावर होतो. परंतु, प्रत्येक रुग्णाला ही समस्या असेलच असे नाही. या विषाणूजन्य आजारावर कोणताही निश्चित इलाज नाही. त्यामुळे हा आजार झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लक्षणे –
– चेहऱ्याच्या एका किंवा दोन्ही बाजूंच्या ग्रंथींना सूज येणे
– प्रभावित क्षेत्राभोवती वेदना होणे
– तोंडाच्या कानाच्या खालच्या बाजूस ग्रंथींना सूज येणे
– ताप, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी आणि भूक कमी होणे

विषाणू हवेमुळे पसरू शकतो…

हा विषाणू हवा आणि लाळेद्वारे पसरतोय. बहुतेकदा शाळा आणि डे-केअर्ससारख्या ठिकाणी संसर्गाचा प्रसार होतो. खेळणी, कप आणि भांडी यांसारख्या लाळेने संक्रमित लाळेने वस्तूंच्या माध्यमातून गालगुंड पसरू शकतो. लसीकरण केलेल्या मुलांमध्ये गालगुंड हा सामान्यतः एक सौम्य आजार असला तरी यामुळे श्रवणशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संसर्ग झालेल्या मुलांना सात ते आठ दिवस शाळेत तसेच घराबाहेर पाठवू नये. एमएमआर लसीकरणाला प्राधान्य द्यावे. सुजलेल्या ग्रंथींवर थंड बर्फाने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेकावा.

The post लहान मुलांमध्ये गालगुंड/गालफुगीच्या आजारात वाढ appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar