Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘लग्नासाठी गोरी आणि सडपातळ बायको हवी’; ४० वर्षीय व्यक्तीने थेट तहसीलदारांनाच लिहिले पत्र

by
June 6, 2023
in लाईफस्टाईल
A A
‘लग्नासाठी गोरी आणि सडपातळ बायको हवी’; ४० वर्षीय व्यक्तीने थेट तहसीलदारांनाच लिहिले पत्र
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

राजस्थान : सध्या सोशल मीडियावर एक अर्ज व्हायरल होत आहे. ज्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. एका ४० वर्षीय व्यक्तीने लग्नासाठी बायको हवी यासाठी थेट तहसीलदारांनाच पत्र लिहिले आहे. इतकेच काय तर या व्यक्तीने या पत्रामध्ये केलेल्या मागण्या वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. यात त्याने गोरी, सडपातळ, ३० ते ४० वर्षांची आणि घरातली सर्व कामं करणारी बायको हवी असल्याचे लिहिले आहे. वयाची ४० गाठल्यानंतरही अद्याप लग्न न झाल्याने हा व्यक्ती लग्नासाठी आतुर झाल्याचे यातून दिसते.

३ जूनचा हा अर्ज असल्याचे सांगितले जात आहे. हे पत्र राजस्थानमधील बहरावण्डा या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीने लिहिले आहे. या अर्जदाराचे नाव महावर असून त्याचे वय ४० वर्ष आहे. विशेष म्हणजे या आगळ्यावेगळ्या अर्जाची तहसीलदारांनी देखील दखल घेतली आहे. व्हायरल होत असलेल्या अर्जात लिहिले की, ‘माझ्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. मी घरी एकटाच असल्याने अस्वस्थ झालो आहे. मला घरचे काम करता येत नाही, त्यामुळे घरातील काम करण्यासाठी आणि मला मदत करण्यासाठी बायकोची गरज आहे. माझी विनंती आहे की मला खाली नमूद केल्याप्रमाणे बायको उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा.’

बड़ी अजीब प्रार्थना आई है pic.twitter.com/LpOHPwlKgG

— राजस्थानी ट्वीट (@8PMnoCM) June 4, 2023

या पत्रात त्याने पत्नी सडपातळ आणि गोरी असावी तसेच तिचे वय ३० ते ४० वर्षांदरम्यान असावे. महत्त्वाचे म्हणजे तिला घरातील सर्व कामे आली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान,  हे पत्र ‘राजस्थानी ट्विट’ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुव पोस्ट करण्यात आला आहे. हा अर्ज शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “अतिशय विचित्र विनंती केली आहे.” सध्या या पत्रावर नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत. ‘लवकर बायको शोधून द्या’, ‘बायको हवी की मोलकरीण’, अशा कमेन्ट करत आहेत.

The post ‘लग्नासाठी गोरी आणि सडपातळ बायको हवी’; ४० वर्षीय व्यक्तीने थेट तहसीलदारांनाच लिहिले पत्र appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar