लंडन – जगभरातील फॅशन डिझायनर्स आणि मॉडेल्स यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या लंडन फॅशन शो मध्ये यावर्षी भारतीय साड्यांचे प्रदर्शन होणार आहे. 90 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या साड्या घालून मॉडेल रॅम्प वॉक करणार आहेत. 19 मे रोजी लंडन येथे होणाऱ्या या फॅशन शोसाठी ऑफ बीट साडी हा विशेष विभाग उघडण्यात आला असून, त्यामध्ये या मॉडेल विविध प्रकारच्या साड्या परिधान करून रॅम्प वॉक करणार आहेत.
डिझाईन म्युझियम या संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणारा हा फॅशन शो आत्तापर्यंतचा सर्वात मोठा फॅशन शो ठरणार आहे लेडी गागाने 2010 मध्ये परिधान केलेली साडी सुद्धा या फॅशन शोमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. 2022 च्या कॅन्स फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेली जाळीदार साडी सुद्धा या रॅम्प वॉक वर दिसणार आहे.
या फॅशन शोमध्ये साडीचे विविध रूपे दिसणार असून रेडी टू वेअर साड्या सुद्धा असणार आहेत तसेच स्टीलच्या धाग्यांपासून तयार करण्यात आलेली एक साडी सुद्धा या प्रदर्शनात असणार आहे. साडीसोबत सहसा ब्लाऊज परिधान केला जातो पण आता या फॅशन शोच्या निमित्ताने शर्ट आणि साडी असे वेगळे कॉम्बिनेशन सुद्धा पहायला मिळणार आहे. या फॅशन शो मध्ये विविध प्रकारच्या साड्या प्रदर्शित करण्यात येणार असल्या तरी त्यातील भारतीयत्व आणि भारतीय संस्कृती मात्र कायम ठेवण्यात येणार आहे
The post लंडन फॅशन शोमध्ये भारतीय साड्या; 90 पेक्षा जास्त प्रकारच्या साड्यांचे होणार प्रदर्शन appeared first on Dainik Prabhat.