ऑफिसमध्ये बसून काम (office worl) करणाऱ्यांना अनेकदा स्नायूंच्या गंभीर आजारांचा (muscle diseases) सामना करावा लागतो. सुरुवातीला ऑफिसमधील आठ तास काम निवांत आणि पैसा देणार असलं तरी म्हातारपणात याच कामाच्या सवयीमुळे दवाखान्यात पैसे खर्च करावे लागतात. बसून डेस्क वर काम करणाऱ्यांना बीपी,शुगर अशा आजारांचा सामना (health) तर करावाच लागतो शिवाय उत्तर वयात हाडांच्या आजारासारखे अनेक आजार देखील होतात ज्यामुळे शरीर अक्षरशः थकून जाते. (exercise for office workers)
उदरनिर्वाहासाठी आठ तास काम प्रत्येकालाच करावे लागते. अनेकजण नियमित व्यायाम देखील करतात मात्र रोजच्या कामामुळे शरीराला एक वेगळीच सवय पडून जाते ज्याचा त्रास पुढे होऊ लागतो. मात्र आपण हे परिणाम टाळण्यासाठी काही पावले उचलू शकतो.ऑफिस काम करता करता अगदी सोप्या पद्धतीने आपण काही गोष्टी पाळून शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेऊ शकतो.
चालत जा : वेळोवेळी उठून काही पावले चालत जा. दर तासाला किमान ५ मिनिटे चाला. असे केल्याने तुम्ही तुमचा रक्तदाब आणि शुगर दोन्ही नियंत्रित करू शकता.
नीट बसा : पोट बाहेर ठेवून निवांत बसणे, मान सतत वाकवून बसणे किंवा पाय पाय टाकून बसणे यामुळे समस्या अनेक पटींनी वाढू शकते. योग्य बसण्याची स्थिती ठेवा. तुमची पाठ सरळ आणि दोन्ही पाय जमिनीवर ठेवून बसा. या आसनाचा कंटाळा आला की उठून थोडे चालावे. पण चुकीच्या पद्धतीने बसू नका.
स्ट्रेच आणि हालचाल करा : तुमची मान, बोटे, हात आणि पाठ वेळोवेळी ताणत राहा, जेणेकरून स्नायू लवचिक राहतील आणि जॅम होणार नाहीत आणि शरीरात कुठेही मुंग्या येणे किंवा जळजळ होणार नाही.
डोळे बंद करून आराम करा : दर तासाला काही सेकंद किंवा मिनिटे डोळे बंद करून आपले डोळे शांत करा. यामुळे मानसिक शांतीही मिळते आणि मन पुन्हा एकाग्र होण्यास तयार होते. याशिवाय सतत सतर्क राहिल्याने थकलेल्या डोळ्यांनाही विश्रांती मिळते.
व्यायाम करा : तज्ज्ञांच्या सूचनेनुसार दररोज काही व्यायाम निवडा जेणेकरून बसल्यामुळे सुरू झालेल्या सर्व समस्या औषधाविना बरे होऊ शकतात. समस्या उद्भवू नयेत हा उद्देश असावा.
The post रोज 8 तास बसून काम करताय ? स्नायूंचे आजार टाळण्यासाठी ‘या’ सोप्या गोष्टी नक्की करा appeared first on Dainik Prabhat.