Monday, July 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यासाठी “गुळवेल’!

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2021
in आरोग्य वार्ता
A A
रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यासाठी “गुळवेल’!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे  -आयुर्वेदात अमृतासमान असलेल्या गुळवेल या औषधी वनस्पतीचे संशोधन प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत आहे. या वनस्पतीवर संशोधन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाने विकसित केलेल्या गुळवेल रोपाला करोनाच्या पार्श्‍वभूमीवर रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यासाठी मोठी मागणी होत आहे.

गुळवेल या वनस्पतीला भारतीय राष्ट्र औषधी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रजातीच्या उपयुक्‍ततेमुळे राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी जीवनसाठी अमृता ही मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेत दर्जदार रोपे निर्मिती करणे, रोपे वाटप, लागवड तंत्र विकसित करणे, गुळवेल वापराविषयी जनजागृती कार्यक्रम घेणे, त्याअनुषंगाने संशोधन केले जात आहे. यासाठी देशभरातील विविध संस्थांना प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे.

या संशोधन प्रकल्पाचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या हस्ते नऊ महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. त्याचे सकारात्मक फलनिष्पती आता दिसू लागली आहे.

या माध्यमातून विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील डॉ. दिगंबर मोकाट यांना या संशोधनासाठी आयुष मंत्रालयाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्याद्वारे गुळवेल वनस्पतीवर संशोधन केले जात आहे.

यासंदर्भात वनस्पतिशास्त्र डॉ. दिगंबर मोकाट म्हणाले, गुळवेल वनस्पतीसाठी देश-विदेशातून मागणी होत आहे. तसेच सध्या करोनाच्या काळात नागरिकांना गुळवेल वनस्पतीचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे आतापर्यंत 40 हजार रोपे विनामूल्य वाटप करण्यात आले आहे.

जवळपास 2 लाख रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट असून, त्याद्वारे रोपे उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. गुळवेलच्या खोडापासून औषध वनस्पती तयार केली जाते. मात्र, त्यासाठी रोपे एकाच ठिकाणी उपलब्ध होत नाही. त्याच दृष्टिकोनातून ही रोपे नागरिकांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. भविष्यात गुळवेल वनस्पतीला आणखी मागणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यापीठाचा हा संशोधन प्रकल्प समाजोपयोगी ठरत असल्याचे डॉ. मोकाट यांनी सांगितले.

गुळवेलपासून आयुर्वेद औषधे
गुळवेलीच्या खोडापासून काढा, सुदर्शन चुर्ण, गुडच्यादी, क्‍लाथ, अमृतारिष्ठ, गुडच्यादी चुर्ण, गुडूची लेह, गुडूच्यादी तेल, अमृतादी गुग्गुळ, चंद्रप्रभावटी, गुडूची धृत, क्‍लाथ, लेह, तेल, स्वरस, धनवटी इत्यादी औषधे बनविली जातात.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar