Saturday, December 6, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, आरोग्यास आहे खूपच हानिकारक !

by
August 5, 2025
in फिटनेस
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

health news : तुमचा दिवस कसा सुरू होतो? हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण अभ्यासातून असे दिसून आले आहे की दिवसाच्या सुरुवातीला पौष्टिक आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पोषक तत्वांचे चांगले शोषण सुनिश्चित करण्यासाठी रिकाम्या पोटी अनेक गोष्टींचे सेवन करणे विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

याशिवाय अभ्यासातून असे दिसून आले आहे की एखाद्याने सकाळी पुरेसे पाणी प्यावे. रात्री 8-10 तासांच्या सुमारास शरीरात पाण्याची कमतरता असते, त्यामुळे सकाळी भरपूर पाणी प्यावे. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, ‘रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाऊ नये…’ जर तुम्ही अशा पदार्थांचे सेवन केले तर तुमची दैनंदिन आरोग्य पद्धतीत धोक्यात येऊ शकते आणि त्याचा शरीरावर खूपच घातक परिणाम होऊ शकतो.

कोणते पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी खाऊ नयेत, ते जाणून घेऊया…

१. मसालेदार जेवण :
रिकाम्या पोटी मसाले आणि मिरच्या खाल्ल्याने पोटाच्या अस्तराला त्रास होतो, ज्यामुळे आम्लीय प्रतिक्रिया आणि पोटात मुरडून येते. मसाले तिखट असतात, जे अपचन वाढवू शकतात. त्यामुळे सकाळी तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळा. बरेच लोक समोसे, कचोरी, पकोडे इत्यादींचे सेवन करतात. सकाळच्या नाश्त्यात ते टाळा.

२. ज्यूस :
आपल्यापैकी अनेकजण दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक ग्लास फळांचा ज्यूस घेतात. परंतु हे अजिबात चांगले नाही कारण रिकाम्या पोटी ज्यूस पिल्याने पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो जे शरीरासाठी चांगले नाही.

३. दही :
दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते, जे पोटातील अ‍ॅसिडिटी पातळीला त्रास देते. तसेच, रिकाम्या पोटी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने त्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट करते, ज्यामुळे अ‍ॅसिडिटी वाढते, त्यामुळे सकाळी दही खाऊ नये.

४. नाशपती :
नाशपतीमध्ये आढळणारे क्रूड फायबर पोटाच्या नाजूक अस्तराचे नुकसान करते. तसेच, नाशपती रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन टाळा. जर खायचे असेल तर सकाळी उठल्यानंतर २ तासांनी ओट्स किंवा दलिया सोबत खाऊ शकता.

५. आंबट फळे :
योग्य वेळी खाल्ल्यासच फळे आरोग्यासाठी चांगली ठरतात. आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने अ‍ॅसिडचे उत्पादन वाढू शकते. फळांमध्ये भरपूर फायबर आणि फ्रक्टोज असते, जे रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनक्रिया मंदावते.

६. कॉफी :
दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करणे सामान्य आहे. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने अ‍ॅसिडिटी होऊ शकते. रिकाम्या पोटी तिचे सेवन केल्याने पचनसंस्थेमध्ये हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे काहींना पोटाचा त्रास होऊ शकतो, म्हणून रिकाम्या पोटी कॉफी पिऊ नये.

हे पदार्थ सकाळी खाऊ शकता…

१. भिजवलेले बदाम खा :
अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. बदाम हे मॅंगनीज, व्हिटॅमिन-ई, प्रथिने, फायबर, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिडचा समृद्ध स्रोत म्हणून ओळखले जातात. यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि नंतर सकाळी खा.

२. गरम पाणी आणि मध :
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने आरोग्यासाठी विशेष फायदे होतात. मध विविध खनिजे, जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स आणि एन्झाईम्सने समृद्ध आहे जे तुमचे आतडे स्वच्छ आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.

रिकाम्या पोटी पाण्यासोबत मधाचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते आणि ते तुमचे चयापचय वाढवण्यासही मदत करते. सकाळी कोमट पाणी आणि मध घेणे खूप फायदेशीर मानले जाते.

३. मनुका खाणे आरोग्यासाठी फायदेशीर :
रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्सचे सेवन करणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये मनुके खाणे तुमच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर मानले जाते. बेदाण्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. बदामाप्रमाणेच, मनुका रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा जेणेकरून पोषक तत्वांचे शोषण वाढेल.

बेदाण्यामध्ये नैसर्गिक शर्करा भरपूर असल्याने, सकाळी त्यांचे सेवन केल्याने तुमची उर्जा वाढण्यास मदत होते. मनुका तुमच्या शरीरावर हानिकारक प्रभाव पाडणारे आम्ल देखील तटस्थ करू शकतात. अभ्यासात मनुका खाण्याचे सर्व प्रकारचे आरोग्य फायदे सांगितले आहेत.

Join our WhatsApp Channel

The post रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, आरोग्यास आहे खूपच हानिकारक ! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar