Insomnia ला मराठीमध्ये “अनिद्रा’ किंवा “निद्रानाश’ असे म्हटले जाते. हा एक झोपेसंबंधी विकार आहे, ज्यामध्ये एखाद्याला झोपच लागत नाही. झोपेची पुरेशी संधी व वेळ असूनही या आजारात झोप लागत नाही. उदाहरणार्थ, रात्री झोपण्याची वेळ उलटून गेली व आपण अंथरुणावर असू तरीही झोप लागत नाही.
विस्कळीत दैनंदिनी हे निद्रानाशाचे एक महत्त्वाचे कारण आहे. निद्रानाश हा पुरुषांपेक्षा स्त्रिया, वृद्ध व तरुणांमध्ये जास्त आढळून येतो. करोनाच्या संकटसमयी अनेकांचे मानसिक स्वास्थ्य असंतुलित झाले होते. बदललेले दैनंदिन जीवन, सतत असलेले भीतीचे सावट, जवळच्या व्यक्तींचे मृत्यू व त्यामुळे आलेले औदासिन्य, मोबाइल, टेलिव्हिजन यासारख्या इलेक्ट्रोनिक वस्तूंचा अतिवापर या सर्व गोष्टींचा परिणाम अनेकांच्या “निद्रानाश’ या समस्येसाठी कारणीभूत ठरला. निद्रानाशामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्याला मोठा धोका असतो. अनिद्रेमुळे शारीरिक आजार तर उद्भवतातच; परंतु त्याचबरोबर मानसिक आजारांना देखील निमंत्रण मिळते.
निद्रानाशाची कारणे
– विस्कळीत दैनंदिनी प अति ताण प चिंता विकार प मानसिक आजार प दीर्घकालीन शारीरिक आजार प आयुष्यावर परिणाम करणारी एखादी अप्रिय घटना घडणे प जवळच्या व्यक्तीचे निधन प घटस्फोट प रात्रपाळीची अथवा फिरतीची नोकरी प वेगवेगळ्या टाइम झोन मध्ये फिरती प मोबाइलचे व्यसन प अन्य व्यसनाधीनता
निद्रानाशाची लक्षणे
– रात्री झोपेत अडचण येणे प वारंवार जाग येणे व नंतर झोप न लागणे प खंडित झोप प दिवसभर थकवा जाणवणे प दिवसभर झोपाळल्यासारखे वाटणे प डोळ्यांवर गुंगी येणे प उदासीनता जाणवणे प चिडचिड प आक्रमकता प एकाग्रता व लक्ष केंद्रित करण्यात अडथळा प डोकेदुखी अथवा अर्धशिशीचा त्रास प सामाजिक व्यवहारांमध्ये अडचणी प मानेचे आजार प सायकोसोमॅटीक आजार
उपाय
– झोप लागत नसेल तरीही पुरेशी विश्रांती घेणे प ताबडतोब तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करणे प जीवनशैलीत योग्य तो बदल करणे प झोपण्याच्या व उठण्याच्या वेळा निश्चित करणे प रात्री झोपताना मधुर व आरामदायी संगीत ऐकणे प रात्री झोपण्याच्या आधी उत्तेजना देणारे चहा, कॉफी इत्यादींसारख्या पेयांचे सेवन टाळणे प संध्याकाळनंतर मद्यपान व धूम्रपान टाळणे प झोपण्याच्या आधी काही वेळ इलेक्ट्रोनिक गॅजेट्स व टेलिव्हिजन पाहणे टाळणे प योग्य व संतुलित आहार घेणे वेळेत उपचार घेतल्यास निद्रानाश हा आजार आटोक्यात आणता येऊ शकतो. योग्य औषधोपचार व समुपदेशन घेणे अत्यावश्यक असते.
जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे निद्रानाश होतो
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे निद्रानाश होतो
रात्री उशिरा अंथरुणावर पडूनही जर तुम्हाला लवकर झोप येत नसेल, तर याचे कारण शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते. खरं तर, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे निद्रानाश होऊ शकतो किंवा झोपेची पद्धत बिघडू शकते. व्हिटॅमिन डीच्या पुरवठ्यासाठी, तुम्ही सॅल्मन फिश, अंड्यातील पिवळ बलक, सोया दूध, गाईचे दूध आणि मशरूम घेऊ शकता.