error: Content is protected !!
मुंबई – जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यातील करोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे असून ऍक्टिव्ह रुग्णसंख्येने 20 हजारांचा टप्पा पार केला आहे. ओमायक्रॉन आणि त्याच्या सब व्हेरियंटच्या रुग्णांमुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात चार हजार 255 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 2879 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोनामुक्ताची संख्या 7755183 इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.87% एवढे झाले आहे.
राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात 20 हजार 634 सक्रिय रुग्ण झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांमध्ये मुंबईतील 70 टक्के रुग्ण आहेत. मुंबईत सध्या 17 हजार 5 सक्रिय रुग्ण आहेत. त्याशिवाय ठाणे 3978 आणि पुणे 1453 सक्रीय रुग्ण आहेत. या तीन शहरात सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे आहे.
error: Content is protected !!
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar